शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus in pune : भाजी, औषधे आणण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे त्रेधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 08:11 IST

सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती.

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या शट डाउनची घोषणा करताच नागरिकांनी घरामध्ये मुबलक धान्य भाजीपाला आणि औषधांचा साठा निर्माण करण्यासाठी दुकाणामध्ये गर्दी केली मात्र त्याच दरम्यान पावसाला सुरवात झाल्याने नागरिकांची त्रेधा उडाली.

सिंहगड रस्ता, कर्वे नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास पाउस झाला. कोरोनच्या पार्श्वभूमीवर आज रात्री बारा पासून शट डाउन घोषित झाल्याने नागरिकानी आठ वाजता दुकानामध्ये गर्दी केली होती. पोलिसांच्या आदेशानुसार दुकानदारांनी जमाव पांगविण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभे राहण्याच्या सुचना केल्या होत्या,त्यामुळे दुकानाच्या बाहेर २००-३०० मिटर पर्यंत रांगेत नागरिक सामान घेण्यासाठी उभे होते. मात्र त्याच दरम्यान पावसाला सुरवात झाली त्यामुळे नागरिकांचे पावसात हाल झाले. मात्र अनेकांनी उद्या किराणा दुकाण चालू नसतील किंवा घराबाहेर पडणे कठीण होइल या भितीने पावसार उभा राहून किराणा माल खरेदी केला. पावसानंतर भाज्यांचे भाव चौपटसायंकाली ७ च्या सुमारास सिंहगड रोड कर्वेनगर परिसरातील रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर अनेल भाजी विक्रेत्यानी ठेला मांडला होता. मध्यरात्री नंतर सुरु होणाऱ्या २१ दिवसांच्या शट डाउनमुळे नागरिकांनी भाज्यांच्या खरेदीसाठीही एकच गर्दी केली होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांनीही त्यांचा ठेला गुंडाळला. सुमार अर्धा पाउण तासाने पाउस संपल्यावर काही भाजी विक्रेत्यानी पुन्हा विक्रीला सुरवात केली मात्र त्यावेळी भाज्यांचे दर तब्बल तिप्पट ते चौपटीने वाढविलले होते. दहा रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची पेंडी तब्बल ४० रुपयाना तर १० रुपयांच्या हिरव्या मिरच्यांची जुडी ३० रुपयांपर्यंत चढ्या दराने विकण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेRainपाऊस