शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune : आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:15 IST

आळंदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथील  पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिकांना यामधून सूट देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पवित्र इंद्रायणीत परगावातील लोकांना अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. अखेर शुक्रवारी (दि.२३) पालिकेकडून त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.

राज्यात सध्या कोविड - १९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून राज्यात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आळंदीसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून ते पुढील आदेश होईपर्यंत स्थानिक वगळून अन्य लोकांवर इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Alandiआळंदीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूFamilyपरिवार