शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

Coronavirus Pune : 'ससून'मधील कोविड बेड्स अन् आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवा: महापौर मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 8:00 PM

महापौर मुरलीधर मोहोळ यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र.....

पुणे: कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत आहे. पुणे महापालिका हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना राबवित आहे. तसेच जास्तीत जास्त  मात्र,सध्याची शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता ससूनमध्ये कोविड बेड्स आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मोहोळ म्हणाले, 'आम्ही जास्तीत जास्त चाचण्या करणे, शहरामध्ये ऑक्सिजन बेडस, आयसीयू बेडस उपलब्ध करणे, लसीकरण वेगाने करणे अशा स्वरूपाचे काम युद्धपातळीवर करत आहोत. मात्र शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता त्या प्रमाणात बेडसची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर आहे.

महापालिकेच्या स्तरावर आमची सर्व रुग्णालय आजमितीला पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शिवाय खासगी रुग्णालयाचे देखील ८०% बेड्स  ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, ससूनमधील बेडसची क्षमता १,७५० असूनही तिथे कोरोना रुग्णांसाठी फक्त ५०० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ससूनमधील ६०% बेडस कोरोना रुग्णांसाठी राखीव केले, तरी याठिकाणी बेडसची संख्या १,०५० इतकी होऊ शकते असेही मोहोळ यांनी सांगितले.

महापौर पुढे महापौर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग लवकर नियंत्रणात येण्यासाठी RTPCR चाचण्यांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. आम्ही त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर RT-PCR चाचण्या शहरांमध्ये करत आहोत. दररोज २५,००० ते ३०,००० चाचण्या आम्ही करत आहोत. परंतु यातील फक्त ३,००० चाचण्यांची तपासणी ससून मधील सरकारी लॅबमध्ये केली जातात. उर्वरित चाचण्यांची तपासणी खासगी लॅब मार्फत केली जात आहे. म्हणजेच जवळपास २०,००० पेक्षा जास्त नागरिक जे खासगी लॅबमध्ये चाचण्या करतात, त्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवस विलंबाने येत असल्याने त्यांच्यामार्फत शहरात संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच ससूनमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांची तपासणी क्षमता वाढवण्याची अत्यंत निकड आहे. किमान १०,००० चाचण्यांची तपासणी या ठिकाणी होणे आवश्यक आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाsasoon hospitalससून हॉस्पिटलRajesh Topeराजेश टोपेAmit Deshmukhअमित देशमुख