शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune: ...अखेर पुणे जिल्हा परिषद खरेदी करणार 50 लाखांची रेमडेसिविर इंजेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:40 IST

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय...

पुणे : पुणेजिल्हा परिषदेने 50 लाख रुपयांचा रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदीचा निर्णय घेतला असून, इंजेक्शनची एकूण खरेदी दोन कोटी रुपये पर्यंत केली जाणार असून त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. खरेदी आदेश काढून येत्या दोन दिवसात लस उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असल्याचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गंभीर कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्‍शनचा प्रचंड तुटवडा असल्याने जिल्हा परिषदेने स्व निधी मधून आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते उपलब्ध करून  दिली जाईल. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे ,उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची या संदर्भात गुरूवारी बैठक झाली, त्यामध्ये तातडीने हा निर्णय घेण्यात आला.

सद्यस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. त्यामध्ये जिल्हा निधीतून अधिक दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. आज तातडीने 50 लाख रुपयांच्या रेमडेसिविर औषध खरेदीला परवानगी देण्यात आली. उर्वरित निधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना असलेले अधिकारातून दिला जाणार आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन साठी हाफकिन इन्स्टिट्यूट कडून दर निश्चिती होणार होती, परंतु हाफकिनकडे एकही बोली न आल्याने आता मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या दराप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी दर आल्यास त्या दराने इंजेक्शन  खरेदी केली जातील. ग्रामीण भागातील खाजगी  रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या गंभीर रुग्णांना ही लस खरेदी दारावरच्या किंमतीने उपलब्ध करून दिली जाईल.

लसीचे नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी मार्फत होईल त्यासाठी आगाऊ नोंदणी आणि इंजेक्शन ची आवश्यकता याची पडताळणी करून लस पुरवठ्याचे नियोजन असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेने प्रत्यक्षात निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून दिला असला तरी इंजेक्शनची उपलब्‍धता होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसzpजिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारी