Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:28 PM2021-05-03T21:28:24+5:302021-05-03T21:28:33+5:30

आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत.

Coronavirus Pune: Comfortable! In Pune, 4,046 people recovered from corona on Monday, 2,579 new patients | Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे शहरात सोमवारी ४,०४६ जणांची कोरोनावर मात, २,५७९ नवीन रुग्ण

Next

पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात ४ हजार ४६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यातुलनेत रूग्णवाढही निम्म्याच्या आसपास आहे. आज दिवसभरात १२ हजार २७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ हजार ५७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१ टक्के आहे. 

आज दिवसभरात शहरात ७९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ७२१ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४११ रूग्ण हे गंभीर आहेत.  शहरात आत्तापर्यंत २१ लाख ७५ हजार ३५० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ३० हजार २१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख  ८२ हजार ५१८ कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ४० हजार ७०१ इतकी आहे़ शहरात आजपर्यंत ६ हजार ९९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

-----------

Web Title: Coronavirus Pune: Comfortable! In Pune, 4,046 people recovered from corona on Monday, 2,579 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.