शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Pune : अरे बापरे ! पुण्यात कोरोनाचा दिवसाला तयार होतोय ६ हजार किलो कचरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 21:48 IST

Coronavirus Pune : कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले असून दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा निर्माण होत आहे.

पुणे : कोरोना काळात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले असून दिवसाला सरासरी सहा हजार किलोपेक्षा अधिक कोरोनाचा कचरा निर्माण होत आहे. तर, अन्य वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण आठ हजार किलोपेक्षा अधिक आहे. हा जैविक कचरा इनसिनीरेटरमध्ये जाळला जात आहे. मास्कचा वापर वाढल्याने हा कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत असून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जात आहे. 

पालिकेने एका कंपनीसोबत करार केलेला असून या कंपनीच्या इन्सिनरेटरमध्ये हा कचरा जाळून नष्ट केला जात आहे.  या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. शहरात सद्यस्थितीत जवळपास ५३ हजार रुग्ण गृह विलगिकरणात आणि प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णांवरील उपचारांमधून निर्माण होणा-या कच-यासह पीपीई किट्स, जेवणाची ताटे व अन्य साहित्य असा सहा ते सात टन कचरा दिवसाकाठी निर्माण होत आहे. ----डॉ. नायडू रुग्णालयाजवळील कैलास स्मशानभूमीजवळ असलेल्या या कंपनीवर सध्या वाढलेल्या जैविक कच-यामुळे ताण वाढला आहे. आवश्यकता भासल्यास तळोजा कोरोनाचा कचरा पाठविला जातो. हा कचरा पाठविण्याकरिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली आहे. शहरातील प्रकल्पाची क्षमता चार हजार किलो कच-याची आहे. त्याची पूर्णत: सुरक्षितपणे आणि वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.======वापरलेल्या मास्कचे काय केले जाते रे भाऊ?रुग्णालयांमध्ये वापरलेले मास्क कोविड काचऱ्यासोबतच गोळा केले जातात. यासोबतच गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णांचा कचरा उचलण्याची पालिकेने व्यवस्था लावलेली आहे. हा कचरा वेगळा ठेवला जातो. हा कचरा इनसिनीरेटरमध्ये जाळला जातो. -------शहरात रोज निघणारा कचरा - २१०० मेट्रिक टनओला कचरा - ९०० मेट्रिक टनसुका कचरा - १२०० मेट्रिक टॅनरूग्णालयांमधून निर्माण होणारा कचरा - १४ मेट्रिक टन------रुग्णालयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण १४ टन आहे. यामध्ये कोविडचा कचरा सहा टन तर कोविड व्यतिरिक्त अन्य वैद्यकीय कचरा आठ टनांपर्यंत जमा होतो. या कचऱ्याची बंदिस्त वाहनांमधून वाहतूक केली जाते. हा कचरा रस्त्यावर वा अन्यत्र पडू नये याची खबरदारी घेतली जाते. हा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो.-------शहरात दिवसाला सहा ते सात टन कोविड कचरा जमा होत असून अन्य वैद्यकीय कचराही आठ टनांपर्यंत निर्माण होत आहे. हा कचरा इनसिनीरेटरमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने जाळला जातो. दिवसाला चार हजार टन कचरा नष्ट केला जात आहे. - डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHomeघरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न