Coronavirus Pune : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३६ नवे रुग्ण तर ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 07:25 PM2021-05-14T19:25:21+5:302021-05-14T19:31:00+5:30

पुणे शहरात कोरोना आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख २४ हजार ९९०

Coronavirus Pune: 1 thousand 836 new patients and 3 thousand 318 people recovered from corona virus in Pune city on Friday | Coronavirus Pune : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३६ नवे रुग्ण तर ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त

Coronavirus Pune : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८३६ नवे रुग्ण तर ३ हजार ३१८ जण कोरोनामुक्त

Next

पुणे : पुणे शहरात आज देखील कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक राहिले. शुक्रवारी दिवसभरात १ हजार ८३६ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३ हजार ३१८ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १३८१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २३ हजार ६९२ झाली आहे.   

पुणे शहरात ६ हजार ५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६११ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ३ हजार ३१८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख २४ हजार ९९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५६ हजार २९३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २३ हजार ६९२ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३ हजार ९०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २३ लाख ४० हजार २१० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Coronavirus Pune: 1 thousand 836 new patients and 3 thousand 318 people recovered from corona virus in Pune city on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.