शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जमावबंदीमुळे रुग्णवाहिकांच्या निर्जंतुकीकरणाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 21:23 IST

जमावबंदीमुळे रुग्णवाहिकांच्या निर्जंतुकीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पुणे जिल्हा एम्ब्युलन्स असाेसिएशनकडून करण्यात आली आहे.

पुणे : जमावबंदी असल्यामुळे रुग्णवाहिकांच्या स्वच्छतेसह निर्जंतुकीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे जिल्हा एम्ब्युलन्स असोसिएशनच्यावतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली. हेल्प रायडर्स यांच्यावतीने असोसिएशनच्या सदस्यांची महापौरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.  रुग्णवाहिकांच्या सुरक्षेकरिता त्यांना एन 95 मास्क, सॅनिटायझर, हातमोजे पालिकेने उपलब्ध करून देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली. काही नागरिकांकडून परगावी जाण्याकरिता रुग्णवाहिकांचा गैरवापर प्रयत्न केला जात आहे. सर्व वाॅशिंग सेंटर बंद असल्यामुळे रुग्णवाहिका निर्जंतुक करताना अडचणी येत आहेत. तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये व्यवस्थित बांधून देणे आवश्यक आहे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

महापौरांनी रुग्णवाहिका सफाई आणि निर्जंतुकीकरणासाठी शहरात ३/४ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिल्यावर त्यांनीही व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मान्य केल्याने महत्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे मुख्य समन्वयक प्रशांत कनोजिया यांनी सांगितले. यावेळी मनसेचे पालिकेचे गटनेते वसंत मोरे, असोशिएशनचे ईम्पीलीग भद्रे, गोपाळ जांबे, अंकुश गुळवणी, शरद करंजकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेHealthआरोग्य