शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
5
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
6
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
7
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
8
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
9
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
10
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
11
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
12
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
13
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
14
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
15
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
16
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
17
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
18
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
19
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
20
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे

Coronavirus : पुणे न्यायालयात होणार केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:10 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय 

ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे आदेशराज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत पुण्यात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. पक्षकारांनी गरज असेल तरच न्यायालयात यावे; अन्यथा येऊ नये, असा निर्णय पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या बैठकीत सोमवारी झाला. येरवडा कारागृहातील बंदींना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याबाबतचाही निर्णय झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आहेत. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी सर्व स्तरांतून काळजी घेतली जात आहे. अद्याप नागरिकांमध्ये कोरोनाविषयी भीती आहे. त्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. याविषयीची योग्य माहिती देण्यासाठी न्यायालयाच्या आवारात भित्तीपत्रके लावली आहेत. आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी घेण्याचे पत्र पुणे बार असोसिएशनने प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर बारचे पदाधिकारी व धोटे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पक्षकार हजर राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात सुनावणी करणार नसल्याचा निर्णय झाला आहे. याबाबत धोटे अंतर्गत आदेश काढणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक म्हणाले, की महत्त्वाच्या जामीन, मनाई, स्थगिती आदेश, संपत आलेली प्रकरणे, बाहेरगावहूनपक्षकार आलेल्या प्रकरणात सुनावणी घेण्यास प्राधान्य देणार आहे. इतर प्रकरणांना पुढील तारखा देणार आहेत. नागरिकांनी सुनावणीबाबत कोणतीही भीती बाळगू नये. त्यांच्या अपरोक्ष सुनावणी होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने येरवडा कारागृहातील बंद्यांना प्रत्यक्ष हजर करू नये; तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसArrestअटक