शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

coronavirus : दिलासादायक ! काेराेनाच्या चाचणीचे प्रमाण वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:26 IST

काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर भारतातील १७ कंपन्यांना आयसीएमआरने काेराेनाची चाचणी करणारे किट तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना काही दिवसांपूर्वीच शासनातर्फे काही खाजगी प्रयोगशाळांना कोरोनाच्या चाचणीची परवानगी देण्यात आली. कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे किट जर्मनीहून मागवले जात असताना पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या कंपनीने भारतीय बनावटीचे पहिले किट तयार केले. मायलॅबसह भारतातील  १७ कंपन्यांना आयसीएमआरने किट बनवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतातील खाजगी क्षेत्रही सज्ज  झाले आहे

आयसीएमआरने किट बनवण्यासाठी मान्यता दिलेल्या कंपन्या आणि संस्थांमध्ये  अल्टोना डायग्नोस्टिक, मायलॅब, बीजीआय, क्रिशजेन  बायोसिस्टिीम, एबीआय, हिमिडिया, हुवेल, आयआयटी दिल्ली, किल्पेस्ट, जेनेसिग, रोचे (३ किट), सिगेन,एसडी बायोसेन्सर, ऑम्प्लीजेन इंडिया बायोटेक (२ किट) यांचा समावेश आहे. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार या कंपन्यांकडू  किटची निर्मिती केली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लषात घेऊन चाचणीचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. त्यासाठी जास्त किटची गरज भासणार आहे. नवीन तंत्रदान भारतीयांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावे, यासाठी भारतीय बनावटीचे किट तयार करण्यात आले आहे.आयसीएमआरमध्ये किटच्या अचूकतेची चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती मायलॅबतर्फे देण्यात आली.

थायरोकेअर लॅबचे  डॉ. सेनगुप्ता यांनी लोकमतला सांगितले, कोव्हिड-१९ च्या तपासणीसाठी लागणारे आरटी-पीसीआर प्रोब सुरुवातीला आयसीएमआर आणि एनआयव्हीतफे अमेरिकेकडून मागवण्यात  आले आणि भारतातील सर्व प्रयोगशाळांना वितरित करण्यात आले.  व्यावसायिक किटसच्या वापरालाही आयसीएमआरने मान्यता दिली आहे.  आयसीएमआरला पूर्वकल्पना देऊन आणि परवानगी घेऊन असे किट प्रयोगशाळांना वापरता येतात.  या सर्व किटची आयसीएमआरकडून चाचणी घेतली जाते. किटच्या माध्यमातून  होणारे निदान अचूक असावे, यासाठी खबरदारी घेतली जाते.ह्ण

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार,  कोरोनाची चाचणी केली जाते.  परदेशात जाऊन आलेले लोक, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, लषणे दिसत असलेले संशयित रुग्ण आणि  वैदयकीय षेत्रातील कर्मचारी यांची चाचणी प्राधान्याने केली जाते. आयसीएमआरने मान्यता दिलेले किट प्रयोगशाळांनी वापरणे बंधनकारक आहे. सध्या मेट्रोपोलीस लॅबमध्ये जर्मनीतील अल्टोना आणि पुण्यातील मायलॅबतर्फे तयार करण्यात आलेल्या किट वापरल्या जातात. शासनाकडून मान्यता मिळाल्यापासून आतापर्यंत आमच्याकडे ७०० हून अधिक  तपासण्या करण्यात आल्या आहेत.- डॉ. निलेश शाह, समूह अध्यष, मेट्रोपोलीस हेल्थकेअर

प्रयोगशाळांना चाचणीसाठी मान्यता देण्यापूर्वी आयसीएमआरकडून मागवली जात असलेली माहिती :- लॅबचे नाव, हेड आॅफिस,  कलेक्शन साईटची संख्या आणि पत्ते- आरटी-पीसीआर मशीनची संख्या, बायोसेफ्टी  कॅबिनेटची संख्या- कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी उपलब्ध असणारे रिएजंट 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे