शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Pune : कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीस मिळाली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:25 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : बाधित रुग्णांतील विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे.

पुणे : पुण्यातील नोव्हालीड फार्मा कंपनीच्या औषधांची कोरोनाबााधित रुग्णांवर चाचणी घेण्यास ड्रग कंट्रोल जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी मान्यता दिली आहे. पुढील तीन-चार आठवड्यात या चाचण्या सुरू होणार असून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम समोर येण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली. पुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार आहे.बाधित रुग्णांतील विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे. हे औषध बाजारात आधीपासूनच विक्रीला उपलब्ध आहे. पण या औषधाचे नाव कंपनीकडून प्रसिद्ध केलेले नाही. सध्या या औषधाला ‘एनएलपी २१’ हा कोड देण्यात आला आहे. औषधाचे नाव किंवा कोणत्या आजारासाठी हे औषध वापरात आहे, हे सांगतिल्यास लोक खरेदीसाठी गर्दी करतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून हे औषध वापरात असून शरीरावर कोणतेही घातक परिणाम दिसत नाही. प्रयोगशाळेमध्ये कोरोनासाठी या औषधाच्या चाचण्या घेतल्यानंतर इतर औषधांपेक्षा त्याचा परिणाम अधिक वेगाने व प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आल्याचा दावा कंपनीने केली, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस