शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:24 IST

मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.

पुणे : कोट्यवधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत कोविड-१९ च्या रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा बुधवारी उघड झाला. अ‍ॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-आॅक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ४२ व्या वर्षी हकनाक बळी गेला.मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यातआले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.रायकर यांना ३१ आॅगस्टला रात्री सीईओपीच्या मैदानावरील कोविड-१९ जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांनी इतर पत्रकारांना केलेले मेसेज हे अतिशय धक्कादायक होते. मंगळवारी रात्री दीड वाजता ‘मला खूप वाईट वाटतंय’, मला जेवायला द्या, औषध द्या,’ असे संदेश त्यांनी पाठवले होते./'‘‘त्यांची स्थिती खूपच खालावल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अनेक सरकारी अधिकारी-पदाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरही एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. हा बळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि असंवेदनशिलतेचा आहे,’’ असा आरोप पुणे श्रमिक पत्रकार संघाने केला आहे.चौकशीसाठी समिती‘‘पांडुरंग रायकर यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही कमतरता होती किंवा कसे या करिता चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात आली आाहे,’’ असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की जम्बो हॉस्पिटल सज्ज नसतानाही त्याचे उद्घाटन करण्यात आले. यंत्रणेअभावी रायकर यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJournalistपत्रकारPuneपुणे