शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांसाठी राज्यांतर्गत प्रवास मोफत नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 22:06 IST

केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे.

पुणे : राज्यात ठिकठिकाणी अडकलेले मजुर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला आहे. केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून संबंधित प्रवाशांकडून तिकीट आकारले जाणार आहे.राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शनिवारी (दि. ९) एका आदेशद्वारे मुळ गावी जाऊ इच्छिणाºया सर्वांना एसटीतून मोफत प्रवास करू दिला जाणार असल्याचा आदेश काढला होता. पण त्यानंतर काही तासातच या आदेशामध्ये दुरूस्ती करून दुसरा आदेश काढण्यात आला. सुधारीत आदेशाप्रमाणे इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरीक  महाराष्ट्रात विविध ठिकाणी अकडलेले असतील त्यांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजुर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आले आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचविण्यासाठी एसटीची सेवा मोफत असेल. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असे सुधारीत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून तिकीटाची आकारणी केली जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. यासंदर्भात एसटीतील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे तिकाटाची आकारणी केली जाणार आहे. एसटीने प्रति बस प्रति किलोमीटर ४४ रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. सुरक्षित अंतरासाठी एका बसमध्ये जास्तीत जास्त २२ प्रवासी असतील. त्यानुसार या प्रवाशांकडून किलोमीटरप्रमाणे विभागून पैसे आकारले जातील. एसटीकडे पैसे जणा झाल्यानंतर बस सोडण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनच प्रवाशांची नोंदणीनुसार बसची मागणी केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाकडून सध्या विविध ठिकाणी जाण्यासाठी बसची मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सवलत द्यावीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत करण्याची मागणी केली आहे.  परप्रांतीयांना एसटी व रेल्वेचा प्रवास मोफत दिला जात आहे, मात्र राज्याचे भविष्य असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून पैसे वसुल केले जात आहेत. राज्य शासनाने याचा विचार करून मोफत सेवा द्यावी, असे यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारstate transportएसटी