शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Indapur : इंदापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या १६५ नागरिकांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजेन टेस्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:11 IST

एकूण २२ नागरिक आढळले कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची थेट कोविड केअर सेंटरला रवानगी 

इंदापूर : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर तालुक्यातील, नागरिक विनाकारण फिरून कोरोना रोगाला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येते आहे. पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने इंदापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या १६५ नागरिकांची तपासणी केली असता त्यातील २२ नागरिक कोरोनाबाधित आढळले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले. 

इंदापूर शहरातील बाबा चौक येथे सकाळपासून पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा  तैनात होता. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. तेथे कोरोनाबाधित आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिकेतून थेट कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. 

यावेळी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, तहसिलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा उपस्थित होते. तर कोविड टेस्ट एक्स्पर्ट अजीम तांबोळी, अमोल पाटोळे, वैभव वाघमारे यांनी नागरिकांची कोविड तपासणी केली. 

राज्यात वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" च्या अंतर्गत इंदापूर पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊन म्हणून घोषित केलेल्या शनिवार व रविवारी ही नागरिकांना प्रशासनाने केलेली विनंती समजत नसल्याने प्रशासनाला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले.__________मागील मागील १५ महिन्यातील रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या 

इंदापूर तालुक्यात शुक्रवारी ( दि. २३ ) ग्रामीण २५४ तर शहरी भागात ४६ असे एकूण ३०० कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. मागील सव्वा वर्षात पाहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या आढळून आल्याने, सर्वच विभागाचे प्रशासन शनिवारी प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर आले होते. तर १५७ रुग्ण बरे करून घरी सोडण्यात आले तर ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Indapurइंदापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस