पुणे : आयटी कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम हे शंभर टक्के अनिवार्य करण्यात आले आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग’ उद्योगांमधील व्यवस्थापकीय मनुष्यबळ शक्य तितके कमी करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापेक्षाही कठोर निर्णय घ्यावे लागतील. गरज पडल्यास येत्या काही दिवसात १०० टक्के ‘शटडाऊन’ करावे लागेल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाकडून थेट कलम १४४ लागू केले जात नसले, तरी त्या दृष्टीने पावले उचलण्यास मात्र सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आता संपूर्ण जिल्ह्यात केवळ कोरोनासंदर्भात काम करणारी सरकारी कार्यालये वगळता अन्य सर्व खासगी कार्यालयांमध्ये पाचपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी एकत्र काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी येथे स्पष्ट केले. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत.याबाबत राम यांनी सांगितले, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही; परंतु काळजी मात्र घेतली पाहिजे. यासाठी जिल्हा प्रशासन कडक उपाययोजना करीत आहे. याचच एक भाग म्हणून साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत संपूर्ण पुणे जिल्ह्यात नागरिकांना एकत्र येण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बहुतेक सर्व आयटी कंपन्यांसह ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी (वर्क फ्रॉम होम) देण्याचे आदेश दिले आहेत. तरी, अद्याप जी सर्व खासगी, सरकारी कार्यालये सुरू आहेत अशा सर्व कार्यालयांमध्ये कोणत्याही स्वरूपात पाच किंवा अधिक अधिकारी, कर्मचारी एकत्र येऊन बैठक घेण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे राम यांनी स्पष्ट केले. तसेच, बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सर्व खासगी कार्यालयांमध्ये एका वेळी पाचपेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी काम करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे राम यांनी स्पष्ट केले. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतदेखील दिले आहेत...........औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन शक्यतो थांबू नये, असा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात व्यवस्थापकीय आणि मनुष्यबळ विकास विभागातील कर्मचाºयांना घरून काम करण्यात सांगावे, अशा सूचना ‘मॅन्युफॅक्चरिंग’ कंपन्यांना दिल्या आहेत. परिस्थिती बिकट झाल्यास १०० टक्के ‘शटडाऊन’ केले जाईल.
Coronavirus : शंभर टक्के ‘शटडाऊन’ची पुण्यावर छाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:42 IST
गरज पडल्यास येत्या काही दिवसात १०० टक्के ‘शटडाऊन’ करावे लागेल
Coronavirus : शंभर टक्के ‘शटडाऊन’ची पुण्यावर छाया
ठळक मुद्देखासगी कार्यालयांत पाचपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना एकत्र काम करण्यास बंदी : नवल किशोर राम सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत