शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्यातील गाेगटे शाळा झाली 153 बेघरांचे निवासस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 18:57 IST

लाॅकडाऊनमुळे पुण्यातील बेघरांचे हाल हाेत असल्याने त्यांची राहण्याची व्यवस्था आता पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.

पुणे : इथं राहायला लय मस्तय बाबा ! आम्ही रस्त्यावर होतो आणि तिथं कायबी खायला मिळत नव्हतं. आता इथं आणलंय तर राहायला बी मिळतंय आणि खायलाबी मिळतंय. एकदम मस्त वाटतंय आता. मी गेल्या तीस वर्षांपासून पुण्यात हाय. पण आता या कोरोनामुळं पहिल्यांदाच छान राहायला मिळतंय ! या भावना आहेत रस्त्यावर राहणाऱ्या आजोबाचे ! या बेघर असणाऱ्यांसाठी गोगटे प्रशाला निवासस्थान बनले असून, त्यांना इथे छान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेतर्फे नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे प्राथमिक विद्यालयात रस्त्यावर राहणाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. तिथे त्यांना एकत्र ठेवले असून, जेवणाची सोय देखील केली आहे. आतापर्यंत या ठिकाणी १५३ जणांना आसरा देण्यात आला आहे.

कोरोनामुळे शहरात संचारबंदी करण्यात आली आहे. पण रस्त्याच्याकडेला राहणारे तिथेच राहत होते. त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेतर्फे निवारा केंद्रात ठेवण्यात येत आहे. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोगटे प्रशालेत १५३ बेघर असणाऱ्यांना एकत्र ठेवले आहे. सर्वजण तिथेच झोपत असून, जेवणही तिथेच करत आहेत. सर्वजण एकमेकांच्या सोबत असल्याने इथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. कारण शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांही त्यांना जेवण आणून देत आहेत. त्यांचा संपर्क सर्वांशी येत आहे. यामधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वजण एकमेकांशी गप्पा मारत असून, विविध खेळ खेळत आहेत. काही जण पत्ते खेळतात, तर काही जण चल्लास खेळतात. चल्लास खेळण्यासाठी काही मिळत नसल्याने शेंगदाणेचा वापर करून खेळ मांडत आहेत. या लोकांची झोपायची सोय एकाच ठिकाणी रांगेत केली आहे. पुणे महापालिकेतर्फे त्यांना दररोज पुरीभाजी, पुलाव, भात, पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे सर्वजण अतिशय आनंदात असले तरी कोरोनाबाबतची दक्षता मात्र ते घेताना दिसून येत नाहीत.

पुणे महापालिकेतर्फे येथील सर्वांना दररोज जेवणाची सोय केलीय. पाण्याची सोय आहे. काही संस्थाही आणून देतात. त्यांची योग्य ती काळजी पालिकेकडून घेतली जात आहे. अजून काही बेघरांना इतर ठिकाणी ठेवलंय.- महापालिका कर्मचारी, गोगटे प्रशाला

859 बेघरांना पालिकेने दिला निवारा पुणे शहरातील बेघर नागरिकांना पुणे महापालिकेने निवारा उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे 859 बेघर नागरिकांना पुणे मनपाच्या शाळा, रात्रनिवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना पुणे स्टेशन, बोपोडी, येरवडा, नवीपेठ त्याचबरोबर अन्य भागातील केंद्रात आसरा देण्यात आला आहे. त्यांना अंथरुण-पांघरुण उपलब्ध करून देण्यात आले असून, या सर्व नागरिकांकरिता चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने करून देण्यात आली आहे. पालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका