शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

coronavirus : ग्राहकांना सांगूनही ते ऐकत नाहीत, यात दुकानदारांची काय चूक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 17:37 IST

पुणे शहराच्या पूर्व भागात काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने ताे भाग सील करण्यात आला आहे. तरी देखील नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे समाेर आले आहे.

पुणे : शहराचा पुर्व भाग कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सील करण्यात आला आहे. संचारबंदी केली असताना देखील अनेकदा त्या सुचनेकडे दुर्लक्ष करून नागरिक बाहेर फिरायला बाहेर पडत आहेत. तर जीवनावश्यक वस्तूच्या खरेदी करण्यासाठी काही दुकानासमोर ग्राहक गर्दी करत आहेत. दुकानदाराने सुरक्षित अंतर ठेवा असे आवाहन करून देखील अनेकजण मनमानी करून रांगेत उभे राहत आहेत. त्यांच्या अशा बेजबाबदार वागण्याचा फटका इतरांना सहन करावा लागत आहे. वारंवार सांगूनही ग्राहक ऐकत नसतील तर त्यात आमची काय चूक ? असा प्रश्न स्थानिक दुकादारांनी केला आहे. शहरात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भवानी पेठेत आढळून आले आहेत. यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही. तसेच सकाळी दहा ते बारा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. या भागात मोठया संख्येने किराणा भुसार मालाची दुकाने आहेत. शहरातील अनेक दुकानदार माल खरेदीसाठी या भागात येतात. आता ती संख्या थोड्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र किराणा माल खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सूचना देऊनही ते बेशिस्तपणे वागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे गांभीर्य लक्षात आले नाही. 

दिवसातून तीन, चार वेळा पोलिसांची फेरी होत असते. तरीही नागरिक रात्रीच्या वेळी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडत आहेत. तर सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांची धांदल उडत आहे. सायंकाळनंतर पोलिसांची नजर चुकवून नागरिक घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मंडई, दगडूशेठ परिसरातही सकाळच्या वेळेत नागरिक गाडीवर फिरताना दिसून आले आहेत. हा परिसर कर्फ्युमध्ये येत नसला तरी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस या भागातील नागरिकांना सातत्याने घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. तसेच गल्ल्यांमध्ये बांबू आणि लोखंडी रॉड टाकून प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

दुकान उघडण्याआधीच ग्राहक दुकानासमाेर येऊन बसतातसकाळी दुकान उघडण्याच्या अगोदर अनेक ग्राहक दुकानासमोर येऊन बसतात. दुकानासमोर बऱ्याचदा ग्राहकांची रांग लागलेली असते. त्यांना तुम्ही तुमच्या किराणा मालाची यादी व्हाट्स अप करा किंवा लिहून ठेवा असे सांगितले तरी देखील ते ऐकत नाहीत. रांगेत उभे राहूनच वस्तू खरेदी करायच्या असतात. विनंती करून देखील ते ऐकायला तयार नसतात. उन्हात उभे राहुन वाट पाहत बसतात. अशावेळी पोलीस आले तर ते दुकानदाराला दोष देतात. त्याला विचारणा करतात. आमचे कुठे चुकते ? असा प्रश्न सील करण्यात आलेल्या भागातील एका दुकादाराने उपस्थित केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे