शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचे लक्षणे न आढळल्याने देहूतील दांपत्यास तपासणीनंतर सोडले घरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 17:10 IST

देहूतील बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचे संशयितांना पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी केले होते दाखल

देहूगाव : देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीतील काळोखे मळ्यातील दाम्पत्य कोरोना व्हायरसचे संशयितांना बुधवारी सकाळी पुण्यातील नायडू रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. प्राथमिक तपासणीनंतर कोरोना संदभार्तील लक्षणे आढूळन न आल्याने घरी पाठविण्यात आले आहे. देहूतील संत तुकाराम बीजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वाऱ्यासारख्या बातमीने खळबळ उडाली आहे. देहूगाव येथील काळोखे मळ्यातील एक दाम्पत्य व त्यांची दोन मुले २१ फेब्रुवारीला एका खाजगी ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून दुबईला गेले होते. ते २७ फेब्रुवारीला घरी परतले. त्यांच्या पत्नीला मंगळवारी खोकल्याच्या त्रास होऊ लागल्याने ते माळीनगर येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. तेथे त्यांनी डॉक्टरांना नुकतेच दुबई टुर करून परत आल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देहूला कळविले. त्यांनी ही माहिती देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या रुग्णालयाला कळविली. तेथील वैद्यकीय अधिकारी यामिनी आडबे यांनी तातडीने संशयीताच्या घरी भेट दिली. त्यांनी संबधीत दाम्पत्यांना व त्यांच्या मुलांना पुणे येथील नायडू रुग्णालयात जाण्यास सांगितले व त्यानुसार संबधीत दाम्पत्य रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचे कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना घरी पाठविल आहे. पुढील तीन ते चार दिवस काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यानच्या काळात तुकाराम बीजे निमित्ताने देहूत आलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनीही त्यांच्या घरी भेट दिली असून जर त्यांचे नमुने सकारात्मक आले तर घर व परिसराचे निजंतुर्कीकरण करणार असल्याचे सांगितले. तसेच संबंधित कुटुंबातील आठ लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरpassengerप्रवासीairplaneविमान