शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Coronavirus: पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला दहावर; अमेरिकेहून आलेल्या तरुणाचा रिपोर्ट ' पॉझिटिव्ह '

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:13 IST

Coronavirus तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता..

ठळक मुद्देपुण्यात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषद घशातील द्रवाची तपासणी करून घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे

पुणे : जगभरात धूमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांची झोप उडवली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत चालली असून हा आकडा शुक्रवारी नऊवरून दहावर पोहचला आहे. नुकत्याच अमेरिकेहून आलेल्या एका तरुणाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे.  जगभ्रमंती करून आलेल्या एका दाम्पत्यासह त्याच्या मुलीला आणि या दाम्पत्याला मुंबईहुन पुण्यात आणलेल्या कॅब चालकाला कोरोनाची बाधा झालेली आहे. यासोबतच एका प्रवाशामध्ये सुद्धा कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्ण कोरोनाबधित आहेत. यामध्ये नुकत्याच अमेरिकेहून आलेल्या एका रुग्णाची भर गुरुवारी पडली. पुण्यात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते. शुक्रवारी आणखी एका तरुणाच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेहून पुण्यात आला आहे. या तरुणाचे वय 22 ते 25 च्या दरम्यान असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.या तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता. त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करून घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.या तरुणाला अमेरिकेहून आल्यावर त्रास जाणवू लागला होता. त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करून घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याला डॉ. नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.५००  बेड तयार , त्यापैकी ३७० पुणे महापालिका व १४० पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातआज पहाटे आलेल्या स्पाइस जेटच्या विमानामधून त्यात सात देशामधला एकही नागरिक आला नाही.त्यामध्ये एक महिला जिच्यासोबत एक वषार्चा मुलगा आहे. ती दुबईतून आली आहे. त्या महिला सांगली येथील आहे. तिला नायडू रुग्णालयात  निगराणीखाली ठेवले आहे. रिपोर्ट येणे बाकी आहे.जास्त दराने मास्क किंवा सॅनिटायझर विकेल त्या विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा जास्तीचा साठा करू नये.  आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्यात येईल. शुक्रवार पर्यंत ७०० व्यक्तींना तपासले आहे. २३३ नमुने तपासले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिकाhospitalहॉस्पिटल