शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ‘कोरोना’तही सर्जनशीलतेला धुमारे..! जुन्या गाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 05:22 IST

‘कोरोना, ‘कोरोना आणि ‘कोरोना’ या चर्चेमधून लोकांना काही काळापुरते का होईना बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे.

पुणे : कोरोनामुळे जगाची झोप उडवली असली, तरी सोशल मीडियावर लोकांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले आहेत. कुणी कोरोनावर कविता करतंय, तर कुणी एखादं गाणं तयार करतंय... तर कुणी चक्क जुन्या गाण्यांवर कोरोनाचे शब्द गुंफून रिमिक्सचे व्हिडीओ व्हायरल करतंय... चिंताग्रस्त वातावरणात या कलात्मक निर्मितीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर काही क्षणापुरते का होईना हसू फुलतंय!‘कोरोना, ‘कोरोना आणि ‘कोरोना’ या चर्चेमधून लोकांना काही काळापुरते का होईना बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’ हे शब्द आपल्या खास शैलीत उच्चारताच नेटिझन्सला आयतेच खाद्य मिळाले आणि अभिव्यक्तीला उधाणच आले.चालू घडामोडींवर विडंबनात्मक शैलीमध्ये काव्यरचना करण्यात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा हातखंडा आहे. रामदास आठवले यांच्यावर त्यांना काव्य स्फुरले नसते तरच नवल! आठवले यांच्या ‘गो कोरोना’वर फुटाणे यांनी ‘बाळा गो गो रे’ केलेली कविता व्हायरल झाली. ‘हायकमांड ‘गो’ म्हणताच, जोरजोरात पळतात, पळता पळता अचानक हायकमांडच बदलतात,’ ही कविता वाचून अनेकांच्या ओठावर हसू उमटले.अगदी ‘बाहुबली’मध्ये प्रभासच्या जागी आठवले यांचा चेहरा मॉर्फ करून ‘गो कोरोना गो’चा व्हिडीओ असो किंवा जगभरात कोरोनाची धास्ती अमेरिकेच्या अध्यक्षांनीदेखील किती घेतली आहे, हे दर्शविणारा व्हिडीओ असो या क्लिप्सनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला.चित्रपटसृष्टीतील ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांनीही या आजारासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, हा व्हिडीओ टिष्ट्वट टाकल्यानंतर रेल्वे मंत्रालयानेदेखील हा व्हिडीओ शेअर केला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवले