शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

coronavirus : काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटरची उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 16:53 IST

काेराेना संशयित रुग्णांसाठी काेविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत.

पुणे : शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी (कोवीड केअर सेंटर)डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. याबाबत राम यांनी सांगितले राज्याचे मुख्य सचिवांनी नुकताच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. यात त्यांनी तातडीने केंद्र सरकारच्या आरोग्य व स्वास्थ्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुणे शहराकरिता कोवीड १९ करिता पुणे महानगरपालिकेमार्फत कोवीड १९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रुग्णांच्या कोवीड केअर सेंटर,(डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल)च्या उपाययोजनांबाबत अंतर्गत शासकीय व खाजगी हॉस्पिटलमार्फत खालील प्रमाणे उपाययोजना व नियोजन करण्यात आलेले आहे.

पुणे महानगरपालिका कोवीड केअर सेंटर-৭) ढोले पाटील रोड- नगर रोड नगररोड-वडगावशेरी संगमवाडी (रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी) -डॉ.स्वाती घनवट ९५५२५३४४९६(2) घोले रोड-शिवाजीनगर कै.द्रौपदाबाई कोथरुड बावधन औंध-बाणेर हॉस्पिटल,बोपोडी डॉ.स्वाती बढीये -८८०६६६८७४७३)- सहकारनगर-धनकवडी, सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर , कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना,वडगाव धायरी, डॉ.शुभांगी शहा ९८२२४११३७१(४) हडपसर-मुंढवा कोंढवा-येवलेवाडी वानवडी-रामटेकडी, कै.नामदेवराव शिवरकर प्रसुतिगृह,वानवडी कै.मिनाताई ठाकरे प्रसुतिगृह,कोंढवा, डॉ.जयंत कांबळे ९६८९९१८८४७, डॉ.रुचिता फाटक ९७६५३९०२०२(५)कसबा-विश्रामबाग वाडा, भवानी पेठ बिबवेवाडी (सेंटरचे नाव- सणस मैदान होस्टेल -७२७६०२७४२१ डॉ.अमोल राठोड या ५ कोवीड केअर सेंटरवर एकूण ३७५ खाटांची सोय करण्यात आली आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी कळविले आहे.

पुणे शहरातील कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार पाच भागात कोविड केअर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ढोले पाटील रोड- नगररोड- वडगावशेरी- संगमवाडी या परिसरातील नागरिकांसाठी रक्षक नगर क्रीडा संकुल, खराडी येथे 70 खाटांची, घोलेराडे- शिवाजीनगर-कोथरुड- बावधन-औंध-बाणेर या परिसरातील नागरिकांसाठी कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी येथे 50 खाटांची, सहकारनगर- धनकवडी- सिंहगड रोड- वारजे- कर्वेनगर या परिसरातील नागरिकांसाठी कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखाना, वडगाव धायरी येथे 60 खाटांची, हडपसर- मुंढवा-कोंढवा- येवलेवाडी- वानवडी- रामटेकडी या परिसरातील नागरिकांसाठी कै. नामदेव शिवरकर प्रसुतीगृह वानवडी व कै. मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह कोंढवा येथे प्रत्येकी 10 खाटांची व्यवस्था आणि कसबा-विश्रामबागवाडा- भवानीपेठ-बिबवेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी सणस मैदान हॉस्टेल येथे 175 खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कोणत्याही नागरिकाला सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरित या कोविड केअर केद्रांत तपासणी करीता जावे, असे आवाहनही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर राम