शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

Coronavirus : सुपर स्प्रेडर’ आणतील दुसरी लाट, आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 17:31 IST

Coronavirus in Pune News : राज्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे -  जनसंपर्क अधिक असलेले विविध व्यावसायिक, घरगुती सेवा पुरविणारे कामगार, मजूर, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय कर्मचारी सुपर स्प्रेडर आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्यामध्ये त्यांची भुमिका महत्वाची आहे. त्यामुळे अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण आणि प्रयोगशाळा तपासणी प्राधान्याने करावी, अशा सुचना आरोग्य विभागाने यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच दुसºया लाटे शक्यता गृहित धरून विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले आहे. 

राज्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांश्ी सतत संपर्क येणाºया व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होतो, हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. दुसरी लाट येण्यामध्येही अशा सुपर स्प्रेडर व्यक्ती महत्वाची भुमिका बजावू शकतात, असे परिपत्रकात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. या व्यक्तींचे समूह स्वरूपात सर्वेक्षण तसेच प्रयोगशाळा तपासणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा वेग रोखता येऊ शकतो. त्यासाठी दैनंदिन प्रयोगशाळा तपासणीमध्ये किमान ५० टक्के नमुने हे या गटातीलल व्यक्तींचे असावे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हे आहेत सुपर स्प्रेडर

किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, विविध घरगुती सेवा पुरविणारे कर्मचारी, वाहतुक व्यवसायातील माल वाहतुक करणारे ट्रक चालक, टेम्पो चालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम आदी कामे करणारे मजुर, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील चालक, वाहक, व इतर कर्मचारी, सुरक्षारक्षक, आवश्यक सेवा पुरविणारे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड आदी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेHealthआरोग्य