शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 21:20 IST

पुण्यात रविवारी काेराेनाचे नवे ७२ रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या १ हजार १३९ इतकी झाली आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सलग शंभरच्या पुढेच वाढत असताना, गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा शंभरीच्या आतच राहीला असून रविवारी शहरात ७२ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.  यामुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार १३९ एवढी झाली आहे. तर ससूनमधील तीन जणांचा व मंगेशकर हॉस्पिटलमधील दोन अशा पाच जणांना आज मृत्यू झाला आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातपर्यंत शहरात ७२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, यापैकी ६१ रूग्ण हे नायडू व पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तर, ११ कोरोनाबाधितांवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या शहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४४ जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी सर्वाधिक २८ रूग्ण हे एकट्या ससून हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान आणखी ६ कोरोनामुक्त रूग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही १६५ झाली आहे.

आज मृत्यू पावलेले पाचही रूग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त होते. शहरातील या नव्या ५ मृत्यूमुळे शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांची संख्या ७२ झाली आहे. या रूग्णांपैकी तीन जण ससून हॉस्पिटलमधील व दोन जण मंगेशकर हॉस्पिटलमधील आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे