नारायणगावात शिवराज्याभिषेकनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला राज्याभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:47+5:302021-06-10T04:08:47+5:30
राजुरी येथे मुस्लिम बांधवांसाठी कोविड सेंटर निर्माण केले आहे, मात्र तेथे हिंदू-मुस्लिम रुग्ण बांधव एकत्रित उपचार घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ...

नारायणगावात शिवराज्याभिषेकनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला राज्याभिषेक
राजुरी येथे मुस्लिम बांधवांसाठी कोविड सेंटर निर्माण केले आहे, मात्र तेथे हिंदू-मुस्लिम रुग्ण बांधव एकत्रित उपचार घेऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन देत आहेत. तालुक्यात एक सामाजिक बांधिलकी याद्वारे जपली जात आहे. सरपंच बाबू पाटे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या कोविड सेंटरला एक साउंड आणि माईक भेट दिले.
या कार्यक्रमासाठी तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, राजाभाऊ पायमोडे, पंचायत समिती सदस्य जीवनभाऊ शिंदे, आंबेगावचे सुरेश भोर, सुनील बाणखिले, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, रोहिदास तांबे, माजी उपसरपंच संतोष वाजगे व इतर मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले, तर हेमंत कोल्हे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : ०९ नारायणगाव शिवराज्याभिषेक
फोटो ओळ - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विठाई साबीर लंगरचे वाटप माजी खासदार, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माऊली खंडागळे, राजाभाऊ पायमोडे, जीवन शिंदे, सुरेश भोर, सुनील बाणखिले, सरपंच बाबू पाटे उपस्थित होते.