शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट;10 टक्केच सोने खरेदी होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 18:48 IST

दुकाने बंद असल्याचा फटका व्यावसायिकांना बसणार

ठळक मुद्देदुकाने बंद असल्याने यंदाचा हा सण घरातीलच गोडधोड पदार्थ करून सर्वजण साजरा करणारया दिवशी प्रामुख्याने ग्रॅम पासून ते तोळ्यापर्यंत सोने खरेदी करण्यावर भर

पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफी आणि इतर व्यावसायिकांना देखील  बसणार आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.यंदा मात्र केवळ 10 टक्केच आॅनलाइन सोने खरेदी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.     हिंदू दिनदर्शिकेत अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. यंदा रविवारी ( 26 एप्रिल) हा योग जुळून आला आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला गेल्याने या दिवशी एखाद्या नवीन कामाला प्रारंभ किंवा नवीन वस्तूंची  खरेदी करण्याची प्रथा वषार्नुवर्षे चालत आली आहे. या दिवशी जे शुभ कार्य केले जाते. त्याचे फळ अक्षय मिळते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होणार नाही. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास ते वृद्धिंगत होत जाते असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने ग्रॅम पासून ते तोळ्यापर्यंत सोने खरेदी करण्यावर भर दिला जातो. मात्र यंदाच्या अक्षय तृतीयेवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. एरवी या दिवशी गजबजणारा लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, सोन्या मारुती चौक अशा सर्वच भागांमध्ये नीरव शांतता असणार आहे.  कोरोनामुळे पुढचे चित्र स्पष्ट नसल्याने अनेकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. मिठाईची दुकाने देखील बंद असल्याने यंदाचा हा सण घरातीलच गोडधोड पदार्थ करून सर्वजण साजरा करणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग मुळे एकमेकांना भेटता येणे शक्य नसल्याने सोशल मीडियावरच शुभेच्छा देऊन हा सण 'गोड' मानावा लागणार आहे..........यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट आहे हे खरं आहे.  दुकाने बंद असल्याने सोने खरेदीवर परिणाम होणार आहे.तरीही आम्ही शासनाच्या सूचनांचे पालन करणार आहोत.  या दिवशी सोने खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा ऑनलाइन माध्यमातून केवळ 10 टक्केच खरेदी होईल. ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना दहा ते पंधरा दिवसांनी डिलिव्हरी दिली जाईल- फत्तेचंद रांका, अध्यक्ष  पुणे सराफ असोसिएशन आणि पुणे व्यापारी महासंघ............. 

टॅग्स :PuneपुणेAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाGoldसोनं