कोरोनाबाधित रुग्णाचा घरीच मृत्यू, धक्क्याने पत्नीही झाली बेशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:47+5:302021-04-11T04:10:47+5:30
कर्वेनगर : कोथरूडमधील पौड रस्ता हनुमाननगर या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाचा उपचाराअभावी घरीच मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचे भयानक स्वरूप उपनगरात ...

कोरोनाबाधित रुग्णाचा घरीच मृत्यू, धक्क्याने पत्नीही झाली बेशुद्ध
कर्वेनगर : कोथरूडमधील पौड रस्ता हनुमाननगर या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाचा उपचाराअभावी घरीच मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचे भयानक स्वरूप उपनगरात नागरिकांना पाहायला मिळत आहे. त्यात पालिका प्रशासन हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित व्यक्तीने सोमवारी टेस्ट केली होती. तिचा अहवाल येणास उशीर झाला. तोपर्यंत व्यक्ती घरीच उपचार घेत होती. परंतु बेडअभावी किंवा उपचाराभावी घरीच उपचार घेत असल्याने रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली होती. याचा परिणाम रुग्ण घरीच दगावण्यात झाली. आपल्या आतापर्यंत जिवंत पतीच्या मृत्यूचा धक्का पत्नी सहन करू शकली नाही. त्या धक्क्यातच ती मयताशेजारीच बेशुद्ध पडली.
नगरसेवक दीपक मानकर यांनी फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली. पण रुग्णवाहिका उपलब्ध ़झाली नाही. शेवटी स्वखर्चाने रुग्णवाहिका आणून संबंधित महिलेला नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिचा जीव वाचविण्यात आला.
कोट
कर्वेनगर-कोथरूडमध्ये रुग्ण वाढत असून जम्बो कोरोना सेंटर सुरू करावे. तसेच या भागात फक्त दोनच रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्याही कमी पडत आहे त्यांची संख्या वाढवावी. - दीपक मानकर, नगरसेवक