कोरोना : पहिला आठवडाच तुमच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:42+5:302021-05-15T04:10:42+5:30

मागील वर्षी आलेल्या कोविड 19 या जागतिक माहामारीमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. आपण सर्वांनी कोरोना लसीकरण करणे ...

Corona: In your hands for the first week | कोरोना : पहिला आठवडाच तुमच्या हातात

कोरोना : पहिला आठवडाच तुमच्या हातात

मागील वर्षी आलेल्या कोविड 19 या जागतिक माहामारीमुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. आपण सर्वांनी कोरोना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे की, मास्कचा वापर करणे व शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि प्रशासनाचे नियम पाळणे. कारण लसीकरण हे कोरोनावरचे कायमचे किंवा अंतिम औषध नसून ते फक्त कोरोना आजाराची तीव्रता कमी करू शकते. त्यामुळे ज्यांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे त्या नंतरही ज्यांना सर्दी, ताप, खोकला, डायरिया भूक न लागणे, चव न लागणे, डोके दुखणे, अंग दुखणे, घसा कोरडा पडणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे चिन्ह, लक्षणे दिसून आल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठलाही आजार अंगावर काढू नये, ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तब्येत खूपच खालावली असताना CT अणि रक्त तपासणी करणे खूपच गरजेचे असते. परंतु तसे होताना दिसत नाही. दुसऱ्या स्टेजला आजार असताना उपचारामध्ये स्टीरॉईड न घेणे गंभीर असून सहाव्या दिवशीपासून सुरू करणे अधिक फायद्याचे असते. त्यामध्ये उशीर करू नये. Who च्या मान्यतेनुसार आणि जीव वाचवण्यासाठी स्टीरॉयडची मात्रा पुरेशी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोविड काळात शरीरातील रक्त पातळ राहणे खूपच गरजेचे त्यामुळेच शरीरातील रक्तामध्ये गुठळ्या किंवा गाठी होऊ नये यासाठी anticoagulant हे अधिक आवश्यक असते.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीच्या हलगर्जीपणामुळे, बेजबाबदारीमुळे ऑक्सिजन पातळी कमी होऊन रुग्ण हा Hypoxia च्या स्टेजवर जातो व त्यानंतर खूप उशीर झालेला असतो. दम, श्वास घेण्यास अडचण किंवा शरीरात ऑक्सिजन कमी पडत असताना दवाखान्यात पोहचण्यास उशिर करू नये. सहाव्या दिवशी HRCT तपासणीमध्ये 09/25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोर आल्यानंतर ही घरामध्ये उपचार घेऊ नये आणि लवकर दवाखान्यामध्ये भरती होवून उपचार घ्यावा. तसेच बीपी, शुगर, जुने आजार अशा व्यक्तींची काळजी अधिक घ्यावी.

लक्षात ठेवा, पहिला आठवडा आपल्या हातात, दुसरा आठवडा तुमच्या डॉक्टरच्या हातात आणि तिसरा आठवडा देवाच्या हातात. आपण स्वत: निर्णय घ्यावा की, आपण आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्या हातात देणार आहात, असे आवाहन करण्यात येत आहे. मी स्वतः 24 तास कोरोना रुग्णांना सेवा देत असून तरी माझ्या आतापर्यंत केलेल्या उपचारातून, अनुभवातून जनतेच्या चुका कुठे होतात हे सांगतो.

सर्व प्रथम रुग्णांनी घाबरून जाऊ नये.

आजार ओळखण्यास उशीर करू नये.

आजाराचा स्वीकार करण्यामध्ये उशीर करू नये.

उपचार सुरू करण्याकरीता उशीर करू नये.

कोरोना (RTPCR) टेस्ट करण्याकरीता उशीर करू नये.

लक्षणे जाणवत असून टेस्ट रिपोर्टसाठी वाट पाहू नये आणि ताबडतोब उपचार सुरू करावा.

आजाराची गंभीरता समजून घेण्यास उशीर करू नये.

औषधांच्या भीतीमुळे सर्व औषधे खाण्याऐवजी औषधांचा अर्धा कोर्स घेऊ नये.

- डॉ. रवींद्र पी. छाजेड (फिजिशियन इंटेंसिव्हिस्ट)

Web Title: Corona: In your hands for the first week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.