शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनामुळे नाही थांबणार ज्ञानार्जन ;घरी बसून ऑनलाईन अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 21:58 IST

ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही  कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांचे तसेच विद्यापीठांचे शैक्षणिक कामकाज सध्या थांबले आहे. मात्र, केंद्र शासनाच्या व इतर नामांकित खाजगी शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळावरून घर बसल्या विविध मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे, लाखो विद्यार्थ्यांनी घरातून ऑनलाईन  पद्धतीने अनेक पदवी व पदविका घेतल्या आहेत. त्यामुळे घरी बसून वेळ वाया घालू नका तर आपल्या ज्ञानात भर झाला, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

 महाराष्ट्रासह विविध राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी घरी बसून काम करत आहेत. या सर्वांसाठी नाविन्यपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही  कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत,असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

 सध्या घरी बसून कंटाळा येत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा संपले आहेत. त्याचप्रमाणे जेईई, नीट,सीईटी या प्रवेश पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा 14 एप्रिल नंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळा,महाविद्यालयांना टाळे आहे.मात्र, केवळ वर्गात बसूनच शिक्षण घेता येते असे नाही. माहिती तंत्रज्ञानामुळे घरबसल्या विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य झाले आहे.

केंद्र शासनाच्या स्वयम् पोर्टल सह मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स (मूक), युडीएसिटी, खान अकॅडमी, स्किल शेअर, टीईडी ईडी, ओपन एज्यु अशा विविध संकेतस्थळांवर मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात प्रोग्रामिंग, बिजनेस, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, लाईफ सायन्सेस, इंजीनियरिंग आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम आहेत.

इयत्ता बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासकडून मिळणारे मार्गदर्शन सध्या मिळत नाही. मात्र, विविध संकेतस्थळांवरुन जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांची तयारी करता येऊ शकते.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 14 एप्रिलनंतर होणार असून काही महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. परंतु, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी घर बसल्या स्वअध्ययनाने आपला अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.

गरज ही शोधाची जननी आहे. देशातील शास्त्रज्ञ कोरोनावर उपाय शोधतील. मात्र, घरी बसून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपला वेळ वाया घालवू नये. मूकसह  विविध ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन कौशल्य विकसित करणारे आणि स्वतःला सक्षम करणारे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा विचार करणे उचित ठरेल.

-डॉ.राम ताकवले,ज्येष्ठ शिक्षतज्ज्ञ व माजी कुलगुरू

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीonlineऑनलाइन