मांजरवाडीत कोरोना योध्दा महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST2021-03-09T04:13:06+5:302021-03-09T04:13:06+5:30
सर्व क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांनी सर्व्हेच्या सूक्ष्म नियोजनामुळे कोरोनाचा प्रसार गावात होऊ शकला नाही. जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली ...

मांजरवाडीत कोरोना योध्दा महिलांचा सत्कार
सर्व क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांनी सर्व्हेच्या सूक्ष्म नियोजनामुळे कोरोनाचा प्रसार गावात होऊ शकला नाही. जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली खंडागळे म्हणाले की, स्त्री-पुरुष समानता निर्माण करून महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणारी स्त्री सुरक्षित बनली पाहिजे. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ म्हणाल्या की, कोरोनाच्या सर्व्हे काळात शिक्षक,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या योगदानामुळे आरोग्य विभाग यशस्वी काम करत होता.
सूर्यकांत थोरात, राजुशेठ मुळे,सरपंच मनीषा मुळे,उपसरपंच संतोष मोरे, ग्रामसेवक भुपेंद्र कांदळकर, मुख्याध्यापक यशवंत गवारी,ग्रामपंचायत सदस्य रोशनी पटवा,नंदा थोरात, डॉ.मोनाली बांडे ,मनीषा गायकवाड ,कमल वायाळ यांनी विचार व्यक्त केले.
सुषमा मुळे यांनी प्रास्ताविक केले. पुष्पलता डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. आशा पाटील यांनी आभार मानले.
जागतिक महिला दिनानिमित्त मांजरवाडीत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.