शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona viurs : बारामतीत कोरोनाचा रूग्ण नाही; अफवांना बळी पडू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:16 IST

काही प्रसार माध्यमांमधून बारामतीमध्ये कोरोनाचे तीन संशयित रूग्ण सापडल्याच्या बातम्या पसरल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण

ठळक मुद्देतालुका आरोग्य विभागाचे आवाहन : एका संशयिताचा उद्या अहवाल मिळण्याची शक्यता तालुका व शहरामध्ये १६९ पथकांच्या माध्यमातून ५ हजार नागरिकांचे सर्वेक्षणकोरोना बाधित देशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस घरातच वास्तव्य करण्याचे आदेश

बारामती : बारामती कोणताही कोरोनाचा रूग्ण अढळला नाही. विदेशातून आलेल्या दोघांना नायडू रूग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. मात्र त्यातील एकामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसल्याने तपासणी न करताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माघारी पाठवले. तर एका संशयिताचा उद्या अहवाल मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, तसेच विदेशातून आलेल्या व्यक्तींनी आवश्यकता असल्यास स्वत:हून पुढे येऊन तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे.

बारामतीमध्ये कोरोनाचे तीन संशयित रूग्ण सापडल्याच्या बातम्या काहीमाध्यमांमधून पसरल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. अधिक माहिती देताना डॉ.खोमणे म्हणाले, बारामती तालुक्यात जर्मनी, दुबई, अमेरिका, नेदरलँड, इटलीआदी देशातून आलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घरातच वास्तव्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात असे १० आणि शहरामध्ये१० व्यक्ती आहेत. दररोज तालुका व शहरामध्ये १६९ पथकांच्या माध्यमातून ५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन दिवसांमध्ये १५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून न जाता फक्त काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. पुढे देखील हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. त्यामध्ये विदेशातून आलेल्या व्यक्ती आढळून येतील. अशा व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती प्रशासनास कळवावी.त्रास होत असल्यास तपासणी करून घ्यावी, संसर्ग टाळण्यात या व्यक्तींचा स्वयं सहभाग खुप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण लवकरच या संसर्गावर मात करू, असा विश्वास देखील व्यक्त केला.---------------------

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल