शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाच्या भीतीने येरवडा कारागृह ‘अलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 20:37 IST

आरोपींना भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना बंदी

ठळक मुद्देकैद्यांकरिता स्क्रीनिंग अत्यावश्यक : पोलीस कर्मचाऱ्यांची होतेय आरोग्य तपासणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाच हजारांपेक्षा जास्त तर खुले कारागृहात १५० हून अधिक बंदी

पुणे : देशभर कोरोनाने सर्वांची झोप उडविली असताना राज्यात दिवसागणिक या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कैद्यांनादेखील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी येरवडा कारागृहाने विशेष काळजी घेतली आहे. त्यात त्यांनी आता कैद्यांची आरोग्य तपासणी, केवळ कैदीच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही ‘स्क्रीनिंग’ अनिवार्य केली आहे.  सध्या राज्यभरातील कारागृहांमध्ये सुरू असणारे विविध वस्तूंच्या उत्पादनाचे काम थांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरोपींना भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांतून कोरोनाचा संसर्गबाधित रुग्ण आढळून आल्याने कारागृह प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाच हजारांपेक्षा जास्त तर खुले कारागृहात १५० हून अधिक बंदी आहेत. राज्यातील विविध कारागृहांमध्ये घेण्यात आलेल्या सुरक्षेविषयी अधिक माहिती देताना कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की कारागृहांमधील वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन आता बंद करण्यात आले आहे. दररोज कारागृहात येणाºया कैद्यांची संख्या लक्षात घेता नवीन कैद्यांपासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक कारागृहातील प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या कैदीची आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय कारागृहातील पोलीस कर्मचाºयांनीदेखील आपले स्क्रीनिंग करून घेणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे एखाद्या कैद्यांत वेगळी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.  कैद्यांना हातपाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. साबणाने हातपाय धुवावेत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. कारागृहातील मुलाखत कक्षामध्ये दररोज ४५० पेक्षा अधिक कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईक गर्दी करतात. अशा वेळी कैद्यांना त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राज्यातील एकूण ५४ कारागृहांमधील ३२ हजारांपेक्षा जास्त असलेल्या कैद्यांच्या तुलनेत दोन तृतीयांश कच्चे कैदी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येवर असलेल्या कैद्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळावा, यासाठी कच्च्या कैद्यांची माहिती जमवण्याचे काम सुरू असल्याचेही देसाई यांनी सांगितले. 

* येरवडा कारागृहातदेखील चप्पल, बूट, कपडे, लाकडी वस्तू, शोभेच्या वस्तू यांसारख्या विविध वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनानेदेखील काळजी घेतली आहे. सध्या या कारागृहात ५९०० पुरुष कैदी बंदिस्त आहेत. ०००

टॅग्स :YerwadaयेरवडाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिस