शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Corona virus : चिंताजनक! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि देशाच्या सरासरीपेक्षा ग्रामीण भागाचा मृत्यूदर अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 11:52 IST

पुण्याच्या ग्रामीण भागातील वाढता मृत्यूदर धडकी भरवणारा.. आजार अंगावर काढण्याच्या सवयीचा परिणाम

ठळक मुद्देआजार अंगावर काढण्याच्या सवयीचा परिणाम

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : ग्रामीण भागात अद्यापही कोरोना महामारी अनेक गैरसमज असून, आजार अंगावर काढण्याची सवय धोकादायक ठरत आहे. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत. यामुळेच सध्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा ग्रामीण भागातील वाढता मृत्यूदर सध्या प्रशासनासाठी चिंताजनक ठरत आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील मृत्यूदर तर सर्वाधिक 4.71 टक्के असून, जिल्ह्यात सर्वाधिक हाॅटस्पाॅट असलेल्या व सर्वाधिक रुग्ण असलेल्या हवेली तालुक्यातील मृत्यूदर केवळ 1.85 ऐवढा आहे.

पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही आरोग्य सेवा-सुविधांच्या नावाने बोंब आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना महामारी येऊन सहा महिने लोटले आहेत. यामध्ये शहरी भागात उपचार मिळताना अडचणी येत असल्या तरी किमान वेळेत उपचार उपलब्ध तरी होत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या कोविड केअर सेंटरचा चांगला लाभ होत आहे. परंतु हाॅस्पिटलची गरज असणा-या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स गरज असलेल्या आणि गंभीर रुग्णांना आजही बेड उपलब्ध होतांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात ग्रामीण भागात खेड्या-पाट्यामध्ये साधे डाॅक्टर देखील उपलब्ध नाहीत. यामुळेच काही लक्षणे दिसली तरी आजार अंगावर काढणे किंवा घरगुती उपचार करण्यावर अधिक भर दिला जातो. यामुळेच ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाल्यानंतर चार-पाच अथवा रुग्ण गंभीर झाल्यानंतर हाॅस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षाअधिक आहे. या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील मृत्यूदर देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा खूपच अधिक आहे. 

ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सोबतच मृत्यूदर देखील वाढत आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग असाच राहिला आणि रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध न झाल्यास मृत्यूदर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच प्रशासनाने याबाबत वेळीच लक्ष न घातल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. -----जिल्ह्याचा तालुकानिहाय मृत्यूदर (नगरपालिकासह) तालुका       मृत्यू          टक्केवारी आंबेगाव     45              3.41बारामती      53             3.31भोर            30              3.53दौंड            56              3.28 हवेली         154            1.85 इंदापूर         43              4.50जुन्नर           66              4.71 खेड           118             2.42मावळ        124             3.79मुळशी        50               2.77पुरंदर          55               3.81शिरूर         87               3.73वेल्हा          10               3.64

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तSaurabh Raoसौरभ राव