पुणे: शहरात घरोघरी फिरून कचरा जमा करणारे स्वच्छ संस्थेचे साडेतीन हजार कर्मचारी संचारबंदी काळातही कार्यरत आहेत. आम्ही खंबीर आहोत, आम्हाला तसेच राहण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले.आहे.कचयार्चा ताण कमी करण्यासाठी म्हणून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ संस्थेची मदत घेतली आहे. शहराच्या सर्व भागात घरोघरी फिरून हे कर्मचारी कचरा जमा करतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे महत्व लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी आपले काम अनेक अडचणी येत असूनही कायम ठेवले.आहे. त्यात अगदीच अपवाद वगळता खंड येऊ दिलेला नाही.
Corona virus : लॉकडाऊनच्या काळातही ' स्वच्छतेचे दूत ' म्हणताहेत आम्ही आहोत खंबीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:08 IST
फक्त नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
Corona virus : लॉकडाऊनच्या काळातही ' स्वच्छतेचे दूत ' म्हणताहेत आम्ही आहोत खंबीर!
ठळक मुद्देफक्त नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन सध्या हातमोजे, कागदी टिश्यूपेपर या कचऱ्याचे प्रमाण जास्तनागरिकांनी या कर्मचाऱ्यांना काही दिवस पुरेल इतका शिधाही द्यावा असेही आवाहन