Corona virus : इंदापूर तालुक्यासाठी दोन हजार बेडची व्यवस्था करणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 07:16 PM2020-09-03T19:16:28+5:302020-09-03T19:25:15+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Corona virus : Two thousand beds will be arranged for Indapur taluka : Collector Dr. Rajesh Deshmukh | Corona virus : इंदापूर तालुक्यासाठी दोन हजार बेडची व्यवस्था करणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Corona virus : इंदापूर तालुक्यासाठी दोन हजार बेडची व्यवस्था करणार : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देइंदापूर येथे राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न अधिकाऱ्यांची तब्बल अडीच तासांची बैठक 

इंदापूर : पुणे जिल्ह्यात आणि त्यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा जलद गतीने प्रसार होत आहे. दिवसोंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान उभे ठाकले असून, आपल्या सर्वांच्या मदतीने कोरोनाला हरवायचे आहे. इंदापूर तालुक्याची कोरोनाची परिस्थिती पाहता इंदापूर तालुक्यासाठी दोन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

इंदापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्वेश्वरय्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,  पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परीषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त अधिकारी हेमंत खराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तहसीलदार सोनाली मेटकरी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, दिलीप पवार, जीवन माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, सुरेखा पोळ, डॉ. सुहास शेळके, रघुनाथ गोफणे आदी विविध खात्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, कोरोना तपासणीचा वेग आल्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढल्याची दिसून येत आहे. तपासणी व कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे आव्हान आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात तीन पटीने कोरोना चाचणीचा वेग वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाने मृत्यू होण्याचा दर आम्हांला कमी करण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. 

आम्ही पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लक्ष देत असून, इंदापूर तालुक्यात दोन वेळा आम्ही दौरा केला आहे. दररोज जिल्हा परिषद मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांशी आम्ही रात्री ९.३० ते १०.३० या एका तासात सर्व चर्चा करत असतो. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध केला आहे. ११० बेड व १८ व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्याचे बांधकाम विभागाला आदेश दिले आहेत. 

जिल्हा परिषेदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात एकूण १० प्रकारच्या आरोग्याच्या सेवेसाठी एकूण ७१ आरोग्य कर्मचारी तात्काळ भरती करून, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी रुजू केले. इंदापूर तालुक्यातील बावडा आणि वालचंदनगर येथे लवकर कोविड केअर सेंटरची व्यवस्था करणार असून, त्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. 

अधिकाऱ्यांची आढावा बैठक तब्बल अडीच तास चालू होती. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर व सखोल चर्चा झाली असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पुढील नियोजित दौऱ्यासाठी जाण्यास उशीर झाला. 
_______________________________________

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी 
इंदापूर तालुक्यात आजपर्यंत एकूण ९१६ रुग्णांची नोंद झाली असून, ग्रामीण भागातील ६६३ व शहरातील २५३ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ३५१ रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील २६५ तर शहरातील ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यांनी व नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. 
- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Web Title: Corona virus : Two thousand beds will be arranged for Indapur taluka : Collector Dr. Rajesh Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.