शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:17 IST

हे दोन्हीही रुग्ण मुंबईवरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले.

ठळक मुद्देहे दोन्हीही रुग्ण पोंदकूलवाडीत त्यांच्या घरीच होते क्वारंटाईन

इंदापूर (बिजवडी) : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका ४२ वर्षे महिलेचा तर २२ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. हे दोन्हीही रुग्ण मुंबई वरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.भिगवण परिसरातील एका महिलेला दि.२८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती .त्यानंतर काही तासातच तिचा मृत्युही झाला. त्यानंतर दि.१६ मे रोजी मुंबई येथून इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे परतलेल्या दोन मायलेकींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर इंदापूर जवळील डॉ .कदम गुरुकुल येथे उपचार सुरु आहेत.त्यातच आता पोंदकुलवाडी येथे आणखी दोन रुग्ण आढळून आले. सध्या इंदापूर तालुक्यात मुंबई - पुणे अशा हाँटस्पॉट मधून जवळपास अठरा हजारांहुन अधिक नागरिक स्तलांतरित झाले आहेत. शिरसोडी येथील दोन रुग्णांच्या नंतर केवळ सातच दिवसात आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे. हे दोन्हीही रुग्ण पोंदकूलवाडीत त्यांच्या घरीच क्वारंटाईन होते. मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर डॉ कदम गुरुकूल येथे उपचार केले जाणार असल्याची माहीती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.सध्या हे रुग्ण कोणाच्या संपर्कात आलेत का? किंवा यांच्या प्रवासाबाबत सखोल माहिती इंदापूर प्रशासनाकडून प्राप्त करण्याचे काम चालू आहे. शिवाय पोंदकुलवाडी चा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.———————————

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई