शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पूर्व हवेली तालुक्यात खासगी प्रयोगशाळेकडून दोन वेळा कोरोना अहवाल चुकीचा; महिलेची पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 13:21 IST

कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने या महिलेचा स्वॅब हडपसर व पुणे शहरातील दोन खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते.

ठळक मुद्देसंबधित महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाने लोणी काळभोर दिली पोलिसांत तक्रार

लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना संसर्ग तपासणीसाठी घेतलेला स्वॅब (घशातील द्राव ) चा तपासणी अहवाल शासकीय प्रयोगशाळेने बाधित नसल्याचा दिला. परंतु, खाजगी प्रयोगशाळेने सलग दोन वेळा चुकीचा अहवाल दिल्याने या खासगी प्रयोगशाळेच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात शुक्रवारी (दि. १२ )रात्री उशिरा लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळा  अशाप्रकारे चुकीचा अहवाल देवून नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार पूर्व हवेलीत उघडकीस आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्याने या महिलेचा स्वॅब सोमवारी (दि. ८ जून ) हडपसर व पुणे शहरातील दोन खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते. दोन्ही प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल परस्परविरोधी आल्याने स्वॅब पुन्हा गुरुवारी ( दि. ११ जून ) पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. या प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने वरील महिला व तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. 

मात्र, एक प्रयोग म्हणून याच महिलेचा स्वॅब पुन्हा नायडू व ससून रुग्णालयातील प्रयोगशाळा तसेच हडपसर येथील खासगी प्रयोगशाळा व पुणे शहरातील त्याच प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. याही वेळेस पुणे शहरातील प्रयोगशाळा वगळता, वरीच चार प्रयोगशाळांनी अहवाल निगेटिव्ह दिला. तर कोरोना चाचणीसाठी पुणे महानगर पालिकेशी टायअप असणाऱ्या पुणे शहरातील त्या खासगी प्रयोगशाळेने मात्र त्याच महिलेचा रिपोर्ट दुसऱ्या वेळीही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला होता. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था, ससुन रुग्णालय तसेच हडपसर येथील खाजगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनेही अहवाल तब्बल पाचवेळा निगेटिव्ह दिला होता. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळा निगेटिव्ह अहवाल देत असताना, खासगी प्रयोगशाळा मात्र तोच अहवाल पॉझिटिव्ह देत असल्याने संबधित महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाने लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत विश्वराज रूग्णालय वरिष्ठ अधिकारी डॉ. पी. के. देशमुख यांनी चुकीचा अहवाल दिल्याच्या आरोपावरुन प्रयोगशाळा व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.  .......................हे प्रकरण गंभीर असून याची सखोल चौकशी सुरु करण्यात येणार आहे. चौकशीत पुणे येथील खासगी प्रयोगशाळेची चूक आढळल्यास प्रयोगशाळेच्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत.- वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल