शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : गिर्यारोहक जम्बो हॉस्पिटलमध्ये समन्वयाचे काम करणार; ४० जणांची फळी सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 18:34 IST

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गिर्यारोहक महासंघाच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांनी ‘कोव्हिड सेवक’ म्हणून काम करुन महापालिका यंत्रणेला मदत केली होती.

पुणे : सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर महापालिकेने रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या स्वयंसेवकांनी महानगरपालिकेच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. महासंघाने जम्बो हॉस्पिटलमधील समन्वयाचे काम पाहण्यासाठी ४० गिर्यारोहक स्वयंसेवकांची फळी सज्ज केली आहे.

महासंघाचे स्वयंसेवक गुरुवारपासून दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत विविध गटांमध्ये जम्बो सेंटरमधील रिसेप्शन सेंटरवर व्यवस्थापकीय कामांमध्ये मदत करतील. त्याचप्रमाणे, रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यातील समन्वयक म्हणून काम पाहतील. मदतकार्याचे नियोजन गिरीप्रेमी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गिर्यारोहक महासंघाच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांनी ‘कोव्हिड सेवक’ म्हणून काम करुन महापालिका यंत्रणेला मदत केली होती. कामाची दखल घेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सध्याच्या तातडीच्या मदतीसाठी महासंघाच्या स्वयंसेवकांना पाचारण करावे, असे सुचवले होते. त्यानुसार महापालिका आणि महासंघ यांच्यातील बैठक पार पडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीप्रेमी संस्थेचे अजित ताटे, सचिन गायकवाड आणि आनंद दरेकर उपस्थित होते. --------------

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार