शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 09:50 IST

राज्य शासनाकडून यादी : सर्व प्रवासी १२ ते २२ मार्च दरम्यान आले भारतात

ठळक मुद्देजागतिक स्तरावर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या कालावधीत अनेक भारतीय विविध देशात . प्रवासी ‘हाय रिस्क ग्रुप’मधील असल्याने त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक

लक्ष्मण मोरे - पुणे : देशातीलआणि राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असन, विदेशवारी केलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच १२ मार्च ते २२ मार्च दरम्यान विदेशातून आलेल्या ‘हाय रिस्क’ गटातील प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे .

राज्यात असे ४५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी असून, पुण्यामध्ये तब्बल साडेचार हजार प्रवासी या कालावधीदरम्यान आल्याचे समोर आले आहे. राज्य शासनान ही यादी पुणे महापालिकेला  पाठविली असन, पालिकेकडून  क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या प्रवाशांचा शोध सुरु केला आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. भारतामध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यू ची संख्या अन्य देशांच्या तुलनेने कमी असली तरी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे . मागील आठवड्याभरापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या कालावधीमध्ये अनेक भारतीय विविध देशात होते.अनेकजण विमानाने  भारतात आले .देशातील विविध विमानतळावर उतरलेल्या या प्रवाशांमधून अनेकजण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. परंतु, १२ मार्च ते २२ मार्च या कालावधीमध्ये भारतातील विविध विमानतळांवर विदेशातून आलेले प्रवासी हे हाय रिस्क ग्रुपमध्ये गणलो जात आहेत. या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये १२ ते २२ मार्च दरम्यान  आलेले तब्बल ४५ हजार प्रवासी आहेत. राज्य शासनाने विविध महापालिका, नगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा अशा प्रवाशांची यादी पाठविली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल ४ हजार ५०० प्रवाशांची यादी राज्य शासनाने पाठविली आह. हे  प्रवासी ‘हाय रिस्क ग्रुप’मधील असल्याने त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आह. ........क्षेत्रीय कार्यालयांकडे यादीशासनाच्या निदेर्शानुसार महापालिकेने ही साडेचार हजार प्रवाशांची यादी क्षेत्रीय कार्यालयांना दिली आहे. या प्रवाशांचे पत्ते शोधून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्याबाबतचे आदेश  देण्यात आले आहेत. या सर्वांचे बारकाईने सर्वेक्षण केले जाणार असून त्यांनी प्रवास केलेला कालावधी हा अत्यंत धोकादायक कालावधी मानला जात आहे. त्यामुळे हे प्रवासी शोधणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, लक्षणाची तपासणी करीत राहणं हे  मोठे आव्हान असणार आहे  . 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAirportविमानतळpassengerप्रवासीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका