शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : आज आमच्यावर पहारा आहे उद्या तो तुमच्यावर असेल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:24 IST

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयार राहवेच लागेल..

ठळक मुद्दे प्रवेश बंद केलेल्या भागातील नागरिकांचा निर्धार

पुणे : शहरातील काही भागात कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. यावर तातडीने पोलिसांनी कार्यवाही सुरू करून आगामी काळातील धोका टाळण्यासाठी तो परिसर पूर्णपणे 'सील' करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून कोरोनाशी लढले पाहिजे. असा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच आपल्यासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आज आमच्यावर पहारा आहे. उद्या तो तुमच्यावर असेल. ते होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. अशा भावना सध्या संचारबंदी असणाऱ्या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

पोलीस प्रशासनाने शहरातील काही भागात संचारबंदी लागू केली आहे. त्यात मंगळवार पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, कागदीपुरा, कामगार पुतळा चौक, चांदतारा चौक, घोरपडे पेठ, कॅम्प परिसर यासारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांना ये जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील अद्याप काही नागरिक पोलिसांच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. काही ठिकाणी पोलिसांना नागरिकांनी उत्तम सहकार्य केले आहे. पोलिसांचे आदेश पाळून कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवण्यात हातभार लावला आहे. येवलेवाडी परिसरात अनेक उच्चभ्रू सोसायटी आहेत. या सोसायटीना दिलेल्या आदेशानुसार बाहेरील लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच कालपासून भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. किराणा मालाची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांना किराणा माल आणण्यासाठी येवलेवाडीतील डी मार्टमध्ये जावे लागत आहे. मेडिकल आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने चालू ठेवली आहेत.

कोंढवा खडीमशीन भागातील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. ते सातत्याने रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांना मेडिकल सोडून सर्वच काही बंद करावे लागत आहे. असे उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले आहे. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी कफ्युर्ला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.याभागात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला सकाळी दोन तासात मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्व मेडिकल दिवसभर उघडी आहेत. नागरिक शक्यतो रस्त्यावर गर्दी करत नाहीत. या भागात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. असे नागरिकांनी सांगितले आहे.* रविवार पेठ भागातही कर्फ्यु लागू केला आहे. पण याठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. येथे नागरिकांच्या मनमानीमुळे किराणा माल, दूध डेअरी बंद करावी लागत आहे. या भागातील मस्जिदमध्ये नमाज पाडण्यासाठी नागरिक जमत आहेत. मस्जिद प्रवेश बंद केला तरी नागरिक दुसऱ्या प्रवेशद्वारातून मस्जिदमध्ये जात आहेत. किराणा माल बंद असल्याने त्या भागातील राजकीय नेते घरोघरी गहू, तांदूळ देत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसMedicalवैद्यकीय