शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे मुंबईहुन आलेले तीन जण कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 14:42 IST

सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक रात्री अपरात्री कोणतीही परवानगी न घेता गावाला येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी घराबाहेर पडु नये दक्षता घ्यावी असे आवाहन

टाकळी हाजी : मुंबई येथुन कवठे येमाई (ता. शिरूर ) येथे परतलेल्या चार लोकांपैकी तीन लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या लोकांना गावी सोडणारा आंबेगाव (साकोरे ) येथील जावयालाही कोरोनाची लागण झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडु नये दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे .    याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि . १५) मुंबई येथुन दोन लहान नातींना घेऊन आजी आजोबा रात्री आंबेगावमधील साकोरे येथील जावयाच्या गाडीत बसुन रात्री कवठे गावात आले. त्यांना कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर सोडून हा जावई फरार झाला .या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई येथे चालक असुन त्याला कोरोनोची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागाने मुंबईतच ताब्यात घेतले . घरामधे राहणारे दोन मुली व आजी आजोबा रात्रीत जावयाला सोबत घेऊन कवठे येमाई येथे घेऊन आले. ही माहिती समजताच ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना क्वांरंटाईन केले. मात्र नंतर संशय आल्याने औंध येथे जिल्हा रुग्णालय येथे रविवारी पाठविण्यात आले. त्या चौघांपैकी आजी आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून जावयाचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला आहे . त्यामुळे कवठे येमाई परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तहसिलदार लैला शेख यांनी तात्काळ प्रशासनाला सुचना दिल्या आहेत . सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक रात्री अपरात्री कोणतीही परवानगी न घेता गावाला येत आहे. तसेच गंभीर बाब म्हणजे याबाबत ते कोणतीही प्रशासनाला माहिती देत नाहीत. चार दिवसापुर्वी टाकळी हाजीमध्ये ही १२ लोक मुंबईमधुन दाखल झाले. ग्रामसेवक राजेश खराडे यांनी त्यांना तात्काळ क्वारंटाईन केले आहे .त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ मुंबई पुणे व परप्रांतीयसाठी छुपा रस्ता ठरलेल्या टाकळी हाजी येथे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी नेमली .शिरूर तालुक्यांच्या पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई, पुण्यामध्ये व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने असुन ते मोठ्या संख्येने छुप्या मार्गाने पोलिसांची नजर चुकवत गावाला परतत आहेत.  

टॅग्स :ShirurशिरुरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणेMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटल