शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Corona virus : कोरोनामुळे 'त्या'ही सापडल्या संकटात ; मग एकमेकींचा आधार होत केली उपासमारीवर मात..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:33 PM

संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.

ठळक मुद्देदेवदासींची जगण्याची लढाई : वीर हनुमान मंडळाचे सहकार्य

पुणे: कोरोना निर्मूलनासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे निर्माण झालेला रोजच्या जेवणाचा प्रश्न बुधवार पेठेतील देवदासींनी स्वतःच एकमेकींचा आधार होऊन सोडवला आहे. एका मंडळाच्या सहकार्याने रोज आळीपाळीने स्वयंपाक करून तब्बल ४०० महिला कशाबशा दिवस ढकलत आहेत.शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे सध्या हाल सुरू आहेत. बहुतेकजणी परप्रांतीय आहेत. संचारबंदीमुळे कोणी त्यांच्याकडे फिरकतही नाही.शिल्लक पैसा सुरूवातीच्या एकदोन दिवसातच संपला आणि या महिलांना ऊपास घडू लागले. तेही त्यांनी एकदोन दिवस सहन केले. परिसरातील वीर हनुमान मित्र मंडळातील कार्यकर्त्यांच्या लक्षात ही बाब आली. रविंद्र कांबळे यांनी पुढाकार घेतला व सहकाराचा एक नवा यज्ञ तिथे सुरू झाला. 

आता रोज सायंकाळी या परिसरातील एका मोकळ्या जागेत रोज सायंकाळी तब्बल ४०० महिलांचा स्वयंपाक होतो. या महिलांपैकीच काही महिला हा स्वयंपाक करतात. मंडळाचे कार्यकर्ते त्यांना कोरडा शिधा पुरवतात. त्यासाठीचा खर्च स्वतः करतात. रोज साधारण ४ हजार रूपये लागतात. एक दिवस भात एक दिवस चपाती भाजी असे करत या महिला स्वतःला कशाबशा जगवत आहेत.रविंद्र कांबळे म्हणाले, सगळ्या महिला अतीशय गरीब आहेत. फसवणूकीतून या व्यवसायात दाखल झाल्या आहेत. तोच बंद पडल्याने त्यांना कोणी वालीच राहिलेला नाही. वेगवेगळ्या प्रांतामधून त्या आल्या आहेत. मदतीसाठी कोणाकडे जावे तर त्यांचे इथे कोणीही नाही. परिसरातील पोलिस ठाण्याकडून सकाळी चहापाण्याची मदत होते. दुपारी काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळाली तळ जेवणाची पाकिटे मिळतात. संध्याकाळी होत असणारे त्याचे हाल मात्र आता त्यांच्याच मदतीने कमी करण्यात मंडळाला यश आले आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसProstitutionवेश्याव्यवसायWomenमहिला