शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Corona Virus : पुणे महापालिकेच्या 'जम्बो'साठी पायघड्या, नायडू रुग्णालय मात्र वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:22 IST

पुणे पालिकेकडून जम्बो रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण नायडूसाठी मागील पाच महिन्यांत काही लाख रुपयांचा टँक उभारता आलेला नाही.

ठळक मुद्देलिक्विड ऑक्सिजन टँकची गरज

- राजानंद मोरे- पुणे : जम्बो रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये देणारी महापालिका आपल्याच नायडू रुग्णालयाला मात्र वाऱ्यावर सोडताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी वाढत असताना केवळ ऑक्सिजन सिलेंटरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सिलेंडर वेळेवर भरून मिळत नसल्याने रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.नायडू रुग्णालयामध्ये यापुर्वीही पुरेशा सिलेंडर अभावी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यानंतर नवीन सिलेंडर घेण्यात आल्याने काही दिवस ही अडचण दुर झाली. पण दळवी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने तसेच नायडूमध्येही हाय फ्लो ऑक्सिजन पुरवठा वाढला. आता सिलेंडर असूनही वेळेवर भरून मिळण्यात अडचणी येत आहेत. ही धावाधाव टाळण्यासाठी बहुतेक मोठ्या रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टँकला प्राधान्य दिले जाते. ससून रुग्णालयात काही दिवसांत १३ हजार लिटरचे टँक उभारण्यात आले. नुकताच जुन्या इमारतीसाठीही ४ हजार लिटरच्या टँकची उभारणी करण्यात आली. दळवी रुग्णालयातही खासगी संस्थेने टँक दिले आहेत. पण याबाबतीत नायडूकडे दुर्लक्ष झाले आहे.पालिकेकडून जम्बो रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण नायडूसाठी मागील पाच महिन्यांत काही लाख रुपयांचा टँक उभारता आलेला नाही. एका ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुमारे १ हजार लिटरच्या ऑक्सिजन टँक उभारणीसाठी सुमारे ६ ते साडे लाख रुपये खर्च येतो. या टँकमधून सुमारे १२० जम्बो सिलेंडर भरतील एवढा गॅस उपलब्ध होतो. खर्चात बचतीबरोबरच वाहतुकही सोपी असते.’ नायडूची सध्या गरज जवळपास दुप्पट असल्याने तसेच पुढील गरज ओळखून ४ ते ५ हजार लिटर क्षमतेच्या टँकची उभारणी करावी लागेल. या टँकचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, तसेच सिलेंडरसाठी ऐनवेळी करावी लागणारी धावपळही थांबले.----------खर्चात होईल बचतएका जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी सुमारे २५० रुपये खर्च येतो. तसेच त्याचा वाहतुक खर्च वेगळा असतो. तर लिक्विड ऑक्सिजनचा खर्च प्रति क्युबिक मिटर सुमारे २० रुपये एवढा आहे. एक हजार लिटरच्या टँकमध्ये सिलेंडर भरण्यासाठी सुमारे १७ ते २० हजार रुपये खर्च येतो. तर तेवढ्या क्षमतेच्या गॅस सिलेंडरसाठी जवळपास ३० हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कायमस्वरूपी लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते.-----------------लिक्विड ऑक्सिजन टँकचे फायदे- गॅस सिलेंडरच्या तुलनेत खर्च कमी- वाहतुक करणे सोपे- एकदा भरल्यानंतर सतत धावपळ करण्याची गरज नाही

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तMayorमहापौर