शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 12:50 IST

काही वर्षांपूर्वी पिंपरी मधीलच एका महाशयांनी सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता...

ठळक मुद्देपाच तोळ्यांचा मास्क वापरण्यासाठी 2 लाख 90 हजार खर्च

पिंपरी:पुण्यातील गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी काही वर्षांपूर्वी पुरुषांसाठी सोन्याच्या चैनी, दागिने अशी नवी फॅशन आणली होती. त्यानंतर मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर 'गोल्डमॅन' तयार झाले. काही वर्षांपूर्वी भोसरीतील एका व्यक्तीने सोन्याचा शर्ट तयार करून घेतला.आता पिंपरी-चिंचवडमधील एका बहाद्दराने सोन्याचा मास्क तयार करून घेतला असून, आपत्तीतही मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची चर्चा शहरात होत आहे.  हौस आणि प्रसिद्धीसाठी लोक काय करतील सांगता येत नाही. कोरोनाच्या आर्थिक संकटाच्या काळात पिंपरी-चिंचवडमधील एका बहाद्दराने कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी चक्क सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. आपत्तीतही मास्कच्या माध्यमातून होणाऱ्या चमकोगिरीची चर्चा शहरात होत आहे. शंकर कुुऱ्हाडे असे त्या पिंपरीतील व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे.हौसेला मोल नाही असे म्हणतात, त्यामुळे कोण काय करेल ते सांगता येणार नाही. आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी लोक काहीही करीत असतात.

पुण्यातील गोल्डमॅनची फॅशन काही वर्षांपूर्वी तत्कालीन मनसे आमदार रमेश वांजळे यांनी सोन्याच्या चैनी, दागिने घालत समाजात आणली होती. त्यांची ही  फॅशन त्यावेळी सर्वत्र तुफान 'हिट 'ठरली. त्यानंतर मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर 'गोल्डमॅन' तयार झाले. काही वर्षांपूर्वी भोसरीतील एका व्यक्तीने सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. त्यानंतर शंकर कुुहार्डे या व्यक्तीने सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे. कोरोनाच्या कालखंडात कुऱ्हाडे यांचा मास्क चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.याविषयी शंकर कुऱ्हाडे म्हणाले, मला सोने घालण्याची आवड आहे. एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी चांदीचा मास्क तयार केला होता. त्यातूनच मला सोन्याचा मास्क तयार करण्याची कल्पना सुचली. आणि मी सोनारांकडे गेलो. मला मास्क तयार करून मिळेल का? अशी विचारणा केली. त्यांनीही संमती दर्शविल्याने मास्क तयार करून घेतला आहे. यासाठी साडेपाच तोळे सोने वापरले असून त्यासाठी २ लाख ९० हजार रुपये खर्च आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGoldसोनंCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस