Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 08:50 PM2020-04-16T20:50:24+5:302020-04-16T20:52:28+5:30

शिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी व इतर तपासणी केलेल्या तब्बल १४४ जणांचा शोध घेत या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Corona virus : Sixty two pregnant women corona report negative in Shikarpur | Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देशिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या  एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे तपासणीत सिद्ध

शिक्रापूर : शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाल्यानंतर येथील  सोनोग्राफी सेंटर मधील काम करणाऱ्या आठ जणांबरोबरच या ठिकाणी आलेल्या या ठिकाणी आलेल्या ६२ गर्भवती महिलांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली
शिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या  एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले होते. आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेत हे सोनोग्राफी केंद्र सिल केले होते. दरम्यान या ठिकाणी आलेल्या सर्वांचा तपास आरोग्य विभागाने घेतला. येथे आलेल्या जवळपास ६२ गर्भवती महिलांच्या स्वॅबचे नमुणे घेऊन ते पुण्यात तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते. या महिलांचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत या सर्वांचे विलगीकरण शिक्रापूर येथील येथील चार लॉजमध्ये करण्यात आले होते. गुरूवारी रात्री या सर्वांचे अहवाल आले. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहे.  दरम्यान  शिक्रापूर व परिसरात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर निर्जंतुकीकरण तसेच इतर उपाय योजनांच्या अंमलबजावणीला प्रशासनाने गती दिली आहे. येथे सोनोग्राफी व इतर तपासणी केलेल्या तब्बल १४४ जणांचा शोध घेत या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Web Title: Corona virus : Sixty two pregnant women corona report negative in Shikarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.