शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खळबळजनक ! कोंढव्याच्या 'कोविड केअर सेंटर' मध्ये ६० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:31 IST

पंख्याच्या सहाय्याने घेतला गळफास

ठळक मुद्देआत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोंढाव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील सेंटरमध्ये घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.गुंडाप्पा शेवरे (वय ६०, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरे आणि त्यांचा मुलगा हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारांसाठी कोंढव्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांवर ४ जुलैपासून उपचार सुरू होते. या दोघांना ठेवलेल्या खोलीमध्ये आणखी दोन रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. एकूण चार जण या खोलीत ठेवण्यात आलेले आहेत. सोमवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी सर्वजण खोलीमधून बाहेर पडले. नाश्ता करण्यासाठी तळ मजल्यावर जायचे असल्याने शेवरे यांचा मुलगा व अन्य दोघे असे एकूण तिघेजण बाहेर पडले. शेवरे नाश्ता करण्यासाठी गेले नाहीत. जेव्हा तिघेजण नाश्ता करून परत आले तेव्हा शेवरे यांनी खोलीमध्ये पंख्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Kondhvaकोंढवाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस