Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:03 AM2020-08-02T01:03:33+5:302020-08-02T01:04:32+5:30

हडपसर येथील नामांकित हॉस्पिटलमधली घटना

Corona virus: Shocking! molestation of corona patient women in ICU, Wardboy arrested | Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देहडपसर पोलिसांकडून विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : वॉर्डातील एकट्या महिलेला त्रास देण्याच्या घटनेनंतर आयसीयु वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.त्यामुळे कोरोना बाधित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे़. याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.हडपसर पोलिसांनी पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन महिलेचा जबाब नोंदविला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना हडपसरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या शुक्रवारी सायंकाळी आयसीयु वॉर्डमध्ये आराम करीत असताना वॉर्ड बॉय पीपीई किट घालून त्यांच्या बेडजवळ आला. त्यानंतर त्याने चेहºयावरील मास्क खाली घेत मला ओळखले का अशी विचारणा केली. या महिलेने ओळखत नसल्याचे सांगितले.तरीही तो त्यांच्याशी जवळीक साधून मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला बेडपासून बाजूला व्हा, असे खडसावले असता त्याने फिर्यादींचा विनयभंग केला. दरम्यान मध्ये दुसरी एक महिला आल्याने हा वॉर्ड बॉय तेथून पळून गेला.या महिलेने ही बाबत हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कुटुंबियांना माहिती दिली. ही माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक आर.आर.पाटील अधिक तपास करत आहेत.

Web Title: Corona virus: Shocking! molestation of corona patient women in ICU, Wardboy arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.