शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

Corona virus : धक्कादायक ! कोरोना रुग्णाला 'आयसोलेट' होण्यास घरमालकाने दिला नकार,पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 4:47 PM

गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यावर घेतले घरात

पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला घरी आयसोलेटची व्यवस्था असतानाही घरमालकाने त्याला घरात घेतले नाही. त्यामुळे रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात जाण्याची वेळ आली. याबाबत माहिती मिळताच महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित घरमालकाशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णाला पुन्हा घरी आणून आयसोलेट करण्यात आले.

पिंपरीगाव येथील तपोवन मंदिर परिसरात भाडेतत्वारील घरात राहणाऱ्या एका नागरिकाला २६ जून रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर दोन दिवस वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तसेच त्यांची घरी आयसोलेट राहण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे महापालिकेने उपचाराला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्याने बुधवारी (दि. १) घरी आयसोलेट होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडून दिले. त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार हा रुग्ण आपल्या भाड्याने असलेल्या  थ्रीबीएचके फ्लॅटमध्ये आयसोलेट होण्यासाठी घरी आला. परंतु, मालकाने या रुग्णाला घरात येऊ देण्यास नकार दिला.महापालिकेने घरीच आयसोलेट होण्याची परवानी दिली असून त्याचे कागदपत्रे रुग्णाने दाखविले. तरीही, मालकाने घरात येऊ देण्यास नकार दिला. निगेटीव्ह रिपोर्ट असल्याशिवाय इमारतीत येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. 

याबाबत महापालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिका अधिकाºयांनी घरमालकाशी संपर्क साधून त्यांची समजूत काढली. तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रुग्णाला घरात घेण्यास त्यांनी तयारी दर्शवली. त्यामुळे रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या रुग्ण घरी आयसोलेट आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह असतानाही कोणतीही लक्षणे नसलेली रुग्ण जास्त संख्येने आहेत. यातील काही रुग्णांची घरी आयसोलेट होण्याची व्यवस्था आहे. अशा रुग्णांना घरी आयसोलेट होण्याची परवानगी दिली आहे. घरमालकांनी या रुग्णांना घरी आयसोलेट होण्यास विरोध करू नये, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल.- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHomeघर