शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Corona virus : धक्कादायक !पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील एकाच विभागात आढळले १२ कोरोना रुग्ण; १०० जणांची तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 19:22 IST

पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयातही दोन पॉझिटिव्ह पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बाधित

पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा सपाटा सुरूच असून बुधवारी आरोग्य विभागातील तब्बल १२ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील दोन कर्मचारी बाधित असल्याचे समोर आले आहे. मुख्य इमारतीमधील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेची मुख्य इमारतच कोरोना 'हॉट स्पॉट' ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बाधित झालेले आहेत. यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पालिकेच्या आठपेक्षा अधिक नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चाललेला असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी बसतात. यासोबतच विविध कोविड केअर सेंटर्ससह विलगीकरण कक्षात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कामानिमित्त पालिकेत येत असतात. यासोबतच नागरिकही आपली कामे घेऊन मुख्य इमारतीमध्ये येत आहेत. 

आरोग्य विभागाच्या शहरी गरीब योजनेसह विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिक येत असतात. या विभागातील काही जणांना त्रास जाणवू लागल्याने बुधवारी आरोग्य विभागातील १०० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये १२ जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या सर्वांना उपचारांसाठी तातडीने पाठविण्यात आले असून काही जणांना गृह विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. पालिका इमारतीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्यांकडून अन्य कोणाला लागण होऊ नये. यासोबतच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील दोन शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. -------- कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आणि विभागामध्ये रजिस्टर ठेवण्यात आले असून त्यामध्ये येणाऱ्या -जाणाऱ्यांची नोंद केली जात आहे. तसेच थर्मल गनच्या मदतीने शरीराचे तापमानही मोजले जात आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौर