शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune News: चिंताजनक! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा नवा रेकॉर्ड; शनिवारी संख्या पोहचली दहा हजार पार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 20:44 IST

Corona virus pune : पुणे शहरात शनिवारी तब्बल ५ हजार ७२० रूग्णांची वाढ...

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात दिवसागणिक नवा रेकॉर्ड करत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात कडक निर्बंध आणले आहेत. तसेच लसीकरणाच्या मोहिमेचा वेग देखील वाढवला आहे. परंतु, शनिवारी तरीदेखील जिल्ह्यात १० हजारांवर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

पुण्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ झालेली आहे. ही वाढ वर्षातली सर्वोच्च वाढ ठरत आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल ५ हजार ७२० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार ७४३ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ८३७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.    उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ७४३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४११ झाली आहे. पुण्याबाहेरील ९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३ हजार ७४३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ८९० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८३ हजार ८१९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ३९ हजार ५१८ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २० हजार ६६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ३९ हजार ८५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका