शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिका खासगी लॅबला देणार नोटिसा; वेळेत माहिती देण्यात कुचराई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 20:14 IST

खासगी लॅबकडून पालिकेच्या आदेश व सुचनांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर

ठळक मुद्देरुग्ण निदानाची टक्केवारी अधिक असण्यामागील कारणांचा घेणार शोध

पुणे : नागरिकांच्या स्वाब तपासणीची तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती वेळेत न देणाऱ्या सहा खासगी लॅबला महापालिका नोटीस बजावणार आहे. यासोबतच या खासगी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह निदानाची टक्केवारी पालिकेच्या टक्केवारीच्या दुप्पट असल्याने यामागील 'नेमक्या' कारणांचाही शोध घेतला जाणार आहे. येत्या सोमवारी खासगी लॅबचालकांसोबत यासंदर्भात बैठक बोलावण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

कोरोनाचा आकडा मागील दोन दिवसांपासून दीड हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारी एकाच दिवसात १४१६ तर गुरुवारी एकाच दिवसात एकदम १८१२ कोरोना रुग्ण आढळून आले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. गुरुवारी निष्पन्न झालेल्या १८१२ रूग्णांपैकी तब्बल ८०० रुग्ण हे खासगी लॅबमधील तपासणीमध्ये निष्पन्न झालेले होते. परंतु, हे ८०० रुग्ण मागील तीन चार दिवसातील तपासणीमधून निष्पन्न झालेले रुग्ण होते. या पॉझिटिव्ह रूग्णांची माहिती त्याच दिवशी अगर २४ तासांच्या आत पालिकेला कळविणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी लॅबकडून ही माहिती पालिकेला वेळेत देण्यात आली नाही. त्यामुळे तीन दिवसातील हे पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारच्या आकड्यांमध्ये एकदम वाढले. खासगी लॅबकडून याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचे आणि पालिकेच्या आदेश व सुचनांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पालिकेने या सर्व खासगी लॅबला नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॅबकडून उशिरा माहिती देणे, पॉझिटिव्ह रूग्णांची २४ तासांच्या आत माहिती न देणे, पॉझिटिव्ह रुग्ण निदानाचा दर ४० टक्के असणे यामागील कारणांचा खुलासा मागविला जाणार आहे. लॅबचालकांची येत्या सोमवारी यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली असून या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.-----------खासगी लॅबचा 'कन्फर्मेशन रेट' पालिकेपेक्षा अधिक कसा?खासगी लॅबकडे तपासणीसाठी जाणाऱ्या नागरिकांमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण तब्बल ४० टक्के आहे. तर, पालिकेचे प्रमाण २२ टक्के आहे. खासगी लॅबची टक्केवारी अधिक असण्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यताही अधिकारी व्यक्त करीत आहेत. या लॅबकडील उपकरणे, साधने, किट जुनी आहेत की नवीन, नेमकी कशा प्रकारे तपासणी केली जाते आदींची माहिती घेतली जाणार आहे. या लॅब्सचा कन्फर्मेशन रेट अधिक कसा काय याचीही पडताळणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल